ढाण्या वाघाला निरोप


ढाण्या वाघाला निरोप 







नगर दि.०५  - कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अश्या घोषणा देत शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला. शिवसेनेचे माजी मंत्री व विद्यमान उपनेता अनिल राठोड  यांचे शव असलेली रुग्णवाहिका अमरधामच्या फाटकातून आत जाताना अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरता आले नाहीत. 

अनिल राठोड यांचे आज पहाटे निधन झाल्यानंतर साईदीप इस्पितळाच्या आवारात शिवसेनेची नेतेमंडळी नगर सेवक आणि शिवसैनिक यांची गर्दी जमली होती तेथेच नेतेमंडळींनी माजी आमदार राठोड यांना श्रद्धांजली वाहून अंतयात्रा निघाली. शव असलेल्या रुग्णवाहिकेच्या पुढे सुमारे दोनशे गाड्यांचा ताफा होता. अंतयात्रा निघण्यापूर्वीच शिवसैनिक आणि प्रशासन यांच्यात अंतयात्रा कुठल्या मार्गाने न्यायची यावर वाद  सुरु होता मात्र अंतयात्रा नेतासुभाष चौकातूनच नेण्यात येईल या मुद्द्यावर शिव सैनिक ठाम राहिले आणि प्रशासनाचा नाईलाज झाला. अखेर ११ च्या दरम्यान अंतयात्रा निघाली साईदीप हॉस्पिटल ते पत्रकार वसाहत चौक , लालटाकी चौक - सर्जेपुरा - तेलीखुंट - या मार्गे नेटसुभाष चौकातून पुढे चौपाटी कारंजा - दिल्ली दरवाजा  मार्गे अमरधाम येथे अंतयात्रा पोहोचताना सुमारे ५००० लोकांचा जमाव उपस्थित होता. अंत्ययात्रेच्या मार्गावरही अनेक ठिकाणी लोकांनी रुग्णवाहिकेवर पुष्प वृष्टी करत आपल्या लाडक्या नेत्याला श्रधांजली वाहिली. 

अमरधाम येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अंत्ययात्रा अमरधाम जवळ येताच फक्त शव असलेली रुग्णवाहिकाच आत सोडण्यात आली. आणि रुग्ण वाहिका आत जाताच फाटके लावून घेण्यात आली. 

बाहेर मोठा जनसमुदाय कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या घोषणेसह भैय्या भैय्या असा नाराही काही शिवसैनिकांनी लावला तसेच अनिल भैय्या अमर रहे च्या घोषणा  देण्यात आल्या. 

यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Post a Comment

0 Comments