अक्षय तृतीयेनिमित्त गोरगरिबांचे तोंड गोड

अक्षय तृतीयेनिमित्त गोड भात  वाटून  शिवसेनेने  केले गोरगरिबांचे तोंड गोड 



३५ दिवसात १ लाख अन्न पदार्थ डब्यांचे  सेनेकडून  वाटप 

अहमदनगर (प्रतिनिधी) अक्षय तृतीयेचा सण साजरा करताना नगरकर लॉकडाऊन मुळे घरीच राहून हा सण साजरा करतायेत . यादिवशी घराघरात आमरस आणि पूरण पोळीचा बेत असतो . पण ज्यांच हातावर पोट आहे त्याच्या घरात गेल्या ३५ दिवसापासून साधी चूल देखील पेटू शकली नाही . आशाच्या आयुष्यात दोन क्षण समाधानाचे यावेत यासाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने सुरु असलेल्या अन्न छत्रात गोड भाताचे वाटप करून या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भुकेलेल्या कष्टकरी कामगार कुटुंबियांचे तोंड गोड करण्यात आले.  अक्षय तृतीयेचा सण नगर शहरातील शिवसैनिकांनी सामान्य गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांच्या तोंडी सणाच्या निमित्ताने गोड घास भरवून साजरा केला . 

 नगर कल्याण रोड वर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी शिवसेना शहर जिल्हा उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते , नगरसेवक बाळासाहेब बोराटे , मंदार मुळे , टिनू भंडारी , विशाल वालकर , मनीष गुगळे ,  मेहुल भंडारी , अजय भोयर , संजय वल्लाकट्टी, शशिकांत  देशमुख, राजू औटी  आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनिल राठोड म्हणाले की, नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिह, पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके , महानगर पालिकेचे अधिकारी , आरोग्य खाते , पोलीस यांनी उत्तम प्रकारे काम केले . त्याला नगरकरांनी चांगलाय प्रकारे सहकार्य केले त्यामुळे नगर शहरातील बाधित रुग्नांपैकी स्थानिक एकही रुग्ण नाही.  शहारत कोरोना कर्फ्यू सुरु होण्या अगोदर पासून शिवसेनेने शहरातील पहिले अन्न छत्र सुरु करून गोर गरिबांचे आशीर्वाद घेतले आहेत . सामाजिक अंतराचे आणि कोरोना कर्फ्यूचे नियम पाळून दररोज ३ हजार पेक्षा जास्त फूड पेकेट्स चे वाटप  शिवसेचे कार्यकर्ते  गेल्या महिनाभरातपसून  दररोज न चुकता करीत आहेत . आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त फूड पेकेट्स चे वाटप शिवसेनेने नगर शहरात केले आहे.

          शहरातील नागापूर बोल्हेगाव , संजयनगर , नगर कल्याण रोड , काटवणं खंडोबा , दातरंगे मळा ,  तोफखाना सर्जेपुरा , रामवाडी , भिंगार नागरदेवळे केडगाव , भूषणनगर या भागात हे फूड पेकेट्स वाटण्यात येत आहेत. पुरी भाजी किंवा पोळी भाजी , मसाले भात , व्हेज बिर्याणी किंवा खिचडी असे फूड पेकेट्स वाटताना शिवसेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते , नगरसेवक आणि समाजातील शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या असंख्य दानशूर व्यक्तींनी यासाठी सहभाग नोंदवला आहे. अनिल राठोड आणि गिरीश जाधव यांनी याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. नगरमधील गोर गरीब जनतेला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा काही मदत लागल्यास तात्काळ स्थानिक शिवसेना नगरसेवक किंवा शिवसेना शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन दिलीप सातपुते यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments