करोना ऐवजी उपाशी मरावे लागणार ?

सामान्यांना करोना ऐवजी उपाशी मरावे लागणार ? 


  मुकूंदनगरवासियांना नाकेबंदीत किराणा धान्य नाही,भाजीपाला दूध महाग 

  वेब टीम नगर,दि.१६ - मुकूंदनगर भागाची नाकेबंदी केल्याने येथे नागरिकांचा संपर्क घरापुरताच राहिला असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही कृती प्रशासनाने केली आहे. आणि मुकूंदनगर वासियांनी प्रतिसाद दिला आहे. या नाकेबंदी बद्दल कोणाची तक्रार नाही.मात्र मुकूंद नगर मधील नागरिकांना जे घरपोहोच भाजी पाला दिला  जातो  तो अल्प किंवा वाजवी दारात नसून उलट ज्यादा भावाने दिला जात असल्याने येथील सर्व सामान्यांना अत्याचा आर्थिक फटका बसत आहे शिवाय दूधही ज्यादा दराने  असल्याने तेही महाग पडते धान्य , किराणा या पासून मुकुंदनगर वासी वंचित आहेत.गेल्या २ आठवड्यांपासून या भागाची नाकेबंदी सुरु असल्याने स्थानिक लोकांची उपासमार होत आहे याकडे कुणी गांभीर्यानी लक्ष देत नाही अशी तक्रार अहमदनगर शहर काँग्रेस च्या अल्पसंख्यांक विभागाने राज्याचे महसूल मंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे दूरध्वनी वरून केली आहे.

या भागातील नाकेबंदी कायम ठेऊन किमान रेशन धान्य दुकान किराणा दुकान,मेडिकल,भाजीपाला खरेदी साठी १-२ तास नाकाबंदी शिथिल करावी,नियम अटी लागू करून स्थानिकांना घराजवळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्न  पुरवठा मंत्री छगन भुजबळ नामदार थोरात जिल्हाधिकारी द्विवेदी आदींना सोशल मीडिया वरून ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.

मुकुंदनगर मधील प्रत्येक व्यक्तीस २ व ३ रुपयाचे रेशन धान्य मिळावे मोफत तांदूळ देण्याची, मोफत २ किलो डाळ देण्याची विनंती आहे. मुकुंदनगर मधील दुकानदारांना भाजीपाला मेडिकल दूध याचा पुरवठा करण्यासाठी संबंधित दुकानदारांनीच नियम अति घालून १-२ तासांची बाजार पेठेत जाण्याची किंवा बाजार पेठेतील व्यापारांना नाकेबंदी सीमेवर होलसेल माल देण्याची परवानगी द्यावी त्यामुळे मुकुंदनगर वासियांना किमान एक वेळचे जेवण तरी मिळेल अन्यथा कोरोना होण्या ऐवजी उपासमार होण्याची शक्यता आहेअशी स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया असल्याचे खान यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

ना.थोरात यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले यावेळी थोरातांनी या बाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी मुकुंदनगर वासियांना किमान किराण्यासह जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान.नरेंद्र मोदी यांनी ७ कलमी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यात त्यांनी सामान्य गरिबांना अन्न  मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे ज्या संस्था,दानशूर व्यक्तींना मुकुंदनगरच्या नागरिकांसाठी अन्नदान मदत देण्यासाठी बंदी आहे किमान नाकेबंदी सीमेवर अशी मदत घेऊन प्रशासनाने आतील भागात तिचे वाटप केलेतर काहींना दिलासा मिळेल. याबाबतही  प्रशासनाने लक्ष घालावे अशी त्यांनी मागणी केली आहे या निवेदनावर अज्जूभाई शेख या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत. 

Post a Comment

0 Comments