लॉक डाउन - पोलिसांनी फास आवळला

लॉक डाउन - पोलिसांनी फास आवळला  वेब टीम नगर,दि.३ - कोरोना विषाणूचा प्रभाव काही केल्या कमी होत नाही अशी स्थिती सध्या तरी नगर शहरात दिसत असून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी  सध्या सुरु असलेल्या लॉक डाउनच्या कारवाईचा फास पोलिसांनी आवळलेला  दिसत आहे.

कालच (दि.२ रोजी) नव्याने कोरोना बाधित संशयित सापडल्याने नगर मधील कोरोना बाधित संख्या वाढल्याने नगरकरांच्या चिंतेत भर पडली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने लॉक डाउन मध्ये फिरताना व्यक्तींना थांबवून त्यांची कसून चौकशी सुरु केली असून विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. अतिआवश्यक सेवा या मथळ्याच्या पाट्या गाड्यांवर लावून फिरणाऱ्यांनाही पोलीस अडवून त्यांची  कसून चौकशी करून कारवाई करत असून अनेकदा या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी स्वतः हजर असतात. 

Post a Comment

0 Comments