कोरोनाचे संकट गडद

कोरोनाचे संकट गडद 

सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय वेब टीम नगर, दि.२ - नगर जिल्ह्यातील जामखेड   , संगमनेर ह्या तालुक्यात देखील कोरोना बाधित सापडल्याने , जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढून १४ पर्यंत गेली. हि मोठी चिंतेची बाब असून संशयित बाधितांची संख्याही  झपाट्याने वाढत असून त्यामुळे शहरात व जिल्ह्यात काहीसे घबराटीचे वातावरण आहे . यावर उपाय म्हणजे शासनाच्या निर्देशाचे काटेकोररित्या पालन करणे आता प्रत्येकासाठी अनिवार्य ठरणार आहे. मात्र शासनाने केलेल्या सूचना निर्देशांचे पालन होत नसल्याने साध्य स्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचीच भीती आहे.


शहरातील प्रचलित बाजार बंद करण्यात आले असून विविध रस्त्यांवर भाजीपाला विक्री करण्यासाठी परवानगी दिली जाते. नेप्ती चौक ते कल्याण रस्ता , बंगाल चौक ते वसंत टॉकीज रस्ता अशा पद्धतीने भाजी पाला विकण्यास परवानगी दिली जाते . त्यामागचे मुख्य कारणच गर्दी एकवटू नये असे आहे . मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. बाजार हाट  करताना नागरिक सोशल डिस्टंसिंग पाळताना दिसत नाहीत त्यामुळेच कोरोना विषाणू पसरण्याची भीती आहे. आडते बाजारात अनेक किराणामालाच्या दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा लागतात मात्र चिंचोळा रस्ता , त्यातच माल उतरवण्यासाठी टेम्पो - ट्र्क यांच्या गर्दीने तसेच दुचाकी वाहनांच्या वर्दळीने वाहतुकीच्या कोंडिने सोशल डिस्टंसिंग पाळणे कठीण होते. मात्र काही दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळले जात असल्याचे दिसून येते.

उरलेले १२ दिवस शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे  पालन केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल मग केंद्र शासनाच्या सुचने नुसार लॉक डाउन  मध्ये ढील देणे सोप्पे होईल अन्यथा आणखीन काही दिवस लॉक डाउनला सामोरे जावे लागेल.Post a Comment

0 Comments