स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण सुरु

स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण सुरु 


२ रु किलो गहू , ३ रु किलो तांदूळ या बरोबरच तूर डाळीचेही वितरण वेब 


 टीम नगर,दि.१ - कॉरोन विषाणूंच्या प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाउन सुरु केल्यानंतर देशातील लोकांची उपासमार होऊ नये म्हणून देशभरातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वाटप करण्याचे नियोजन केंद्र व राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेयात शिधा पत्रिका धारक व्यक्तीला ३ किलो गहू २ रुपये दराने , २ किलो तांदूळ ३ रुपये दराने देण्याचे जाहीर करण्यात आले नव्हे या योजनेचा पहिल्या महिन्याचा धान्याचा कोटा हि रवाना करण्यात आल्याची माहिती धान्य वाटप विभागाचे अधिकारी सुनील सौंदाणे यांनी दिली .

प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ सशुल्क तसेच ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असून या योजनेसाठी लागणारा धान्य साठा गोदामात उपलब्ध आहे असे सांगून एप्रिल महिन्याचे धान्य ग्राहकांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली जिल्ह्यात एकूण ८४१ क्विंटल गहू , ४८५ क्विंटल तांदूळ ,
१२. ११ क्विंटल डाळ आणि ५.६८ क्विंटल साखर इतका शिधा पोहोचला असून एप्रिल महिन्यातील धान्याचे वितरणही झाले आहे. गाव पातळी वरील स्वस्त धान्य दुकानदारांना प्राधांन्यक्रम ठरवून दिला असून सर्वात अगोदर गरजू घटकाला धान्य वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्वस्त धान्य दुकाना  बरोबरच किराणा मालाचे दरही व्यापारी संघटने बरोबर चर्चा करुन निश्चित करण्यात आले आहेत जेणे करून ग्राहकांची कोणत्याही प्रकारची पिळवणूक होणार नाही या बाबत शासकीय यंत्रणा दक्ष आहे. किराणा मालाचे दर पुढील प्रमाणे
साखर -३५ रुपये
साबुदाणा - ७० रु
शेंगदाणा - १०० रु
तेल - ९५ रु
गूळ - ४५ रु
खोबरं -१७०रु
हरभरा डाळ - ६० रु
मठ डाळ - १०० रु
 तूर डाळ - ९० रु

 असे निश्चित करण्यात आले असुन ग्राहकांनी कृपया कुठेही जास्त पैसे देऊन सामान खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments