वादळी पावसाने नगर शहराला झोडपले

वादळी पावसाने नगर शहराला झोडपले 


पाऊस उघडल्यावर सप्तरंगी इंद्र्धनुष्याचे दर्शन 

वेब टीम नगर,दि. २७ - सकाळ पासून लक्ख ऊन पडल्याने पाऊस येणार नाही असे वाटत असतानाच दुपारी ४ च्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण जमले आणि बघता बघता ४वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान गडगडाटासह वादळी पावसाने शहराला झोडपून काढले , सुमारे १५ मिनिट हा पाऊस सुरु होता. हा पाऊस नगर शहरासह , बुर्हाणनगर , भिंगार , कापूरवाडी व सावेडी परिसरासही पावसाने झोडपले.आधीच कोरोना व्हायरसचे सावट सर्वत्र घोंगावत असताना हा पाऊस होत असल्याने वातावरणात आद्र्ता पसरून अन्य रोगराई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.गेल्या २ - ३ दिवसापासून होत असलेल्या सलगच्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.या अगोदरच वेध शाळेने दिनांक २८ पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविल्याने सरकारने पावसानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीवर काय उपाय योजना करावी त्याचेही  नियोजन केले आहे त्यामुळे संचारबंदीच्या काळातही बी बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत.

सलग १५ मिनिटं वादळी थैमान घातल्यानंतर पाऊस उघडला , त्यानंतर लक्ख ऊन देखील पडले या उन्हामुळे पूर्व क्षितिजावर इंद्र धनुष्याची लोभसवाणी कमान अवतरली . 

Post a Comment

0 Comments