परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित



जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा सुरळीत करण्यासाठी

परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित

           वेब टीम नगर, दि. २६ - जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी वा परिवहन संवर्गातील वाहने उपलब्ध करुन देणे यासाठी परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक विलास कांडेकर यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ८१७७८२४८४० असा आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

            तसेच, या नियंत्रण कक्षासाठी इतर अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयातील नियंत्रण कक्षात नेमून दिलेले कामकाज करावे तसेच वाहतुकीच्या संदर्भात प्राप्त वाहनधारकांना परवानगी पास देण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे यासंदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments