दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची प्रेरणा घ्यावी

               
                       

दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची  प्रेरणा घ्यावी 

संजय जोशी-स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी 
 वेब टीम नगर,दि. ३-स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.ते हिंदुस्थानी सेनेचे सेनापती होते.रत्नागिरी येथे मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला नगर जिल्ह्यातील अकोला येथे जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केले.दादा चौधरींनी प्रसंगी तुरुंगवास भोगला.शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती.थोर दादा चौधरी यांनी अनाथ विदयार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी राष्ट्रीय पाठशाळा व राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली.दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.                                                                                                               
हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी,कार्याध्यक्ष अजित बोरा,उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी,दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष  सुधीर झरकर,मेहर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष जगदीश झालानी, बोलके,सुशील गांधी,सहायक सचिव बी.यु. कुलकर्णी,भाई सथा नाईट स्कुलचे प्राचार्य सुनील सुसरे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुदगल,शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे,दीपक आरडे,नितीन केणे,नंदे सर,दिनेश मूळे,दीपक शिंदे,प्रशांत शिंदे,वर्षा गुंडू,ज्योती बोलके आदी उपस्थित होते.                                                                                                                     
 शाळेतील आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे केली.प्रास्तविक अध्यक्ष  सुधीर झरकर यांनी केले.सूत्र संचालन दिनेश मुळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय मुदगल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments