आणि नगरकरांची करोनाशी लढाई सुरु

आणि नगरकरांची  करोनाशी लढाई  सुरु 


भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग 



वेब टीम नगर,दि.२५ - सकाळी ७ ची वेळ काळ मध्य रात्री लागू केलेल्या लॉकडाउनला पोलीस प्रशासनाने थोडिशी ढील दिली त्याबरोबर शेतकरी आणि काही व्यापारी आपल्या टेंपो,मोटर सायकलवर , पिशव्यांतून भाजीपाला घेऊन विकी करण्यासाठी बाजार तळांच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर तसेच मोठ्या वसाहतीतून भाजीपाल्याची विक्री करू लागले ग्राहकांचीही भाजीपाल्यासाठी लगबग सुरु झाली. काहींना किराणामालही  घ्यावयाचा असल्याने किराणामालाच्या दुकानातही गर्दी दिसू लागली तर आजूबाजूच्या गावातून दूध विक्री साठी येणारे दुधवाल्यांचीही वर्दळ दिसायला लागली मात्र एव्हाना १० वाजले आणि पोलिसांनी लाठ्या-काठ्यांचा वापर करत सगळ्यांना पिटाळण्यास सुरवात केली. पुन्हा एकदा रस्ते सुनसान झाले आणि सर्वत्र निरव शांतता पसरली.अशी नागरकरांची करोनाशी लढाई सुरु झाल्याचं चित्र दिसत होतं .

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  राज्य प्रशासनाने आधीपासूनच संचारबंदी जाहीर केली होती त्याला चांगला प्रतिसादही मिळत होता तशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सरसकट १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर केल्याने आता १४ तारखे पर्यंत सर्व कामकाज ठप्प होणार आहे. गावंच्या गावं बंद असल्याने स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधक उपायांची अंमल बजावणी सुरु केली आहे. नगरमध्येही  मनपाच्या वातींने शहराची साफ सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून करोना विषाणू रोखण्यासाठी औषध फवारणी सुरु केली आहे.आज शासकीय रुग्णालय परिसर आणि बोरुडे मळ्याच्या काही भागात औषध फवारणी करण्यात आली.



 मनपाच्या वतीने नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकांमार्फत प्रत्येक घराचे करोना विषाणू संदर्भातील सर्वेक्षण सुरु असून त्यात कोणी परदेशी व्यक्ती आला आहे का ? किंवा कोणी संपर्कात आला आहे का?, कोणाला करोनाची लक्षणं दिसतात का या बाबतीतलं सर्वेक्षणही  सुरु करण्यात आले आहे. मनपाने औषध फवारणी सुरु केली असून नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन मनपाच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध फवारणीनंतर किमान अर्धातास लोकांनी घराच्या दारं - खिडक्या उघडू नयेत अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहाटे ५ ते ९ वाजे पर्यंत किमान १०० रुपयांचे पेट्रोल भरण्यास मुभा असल्याने पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी पेट्रोल पंपावर लोकांनी रांगा  लावल्याचं चित्र पाहायला मिळालं .


एकूणच लॉकडाऊन अंगवळणी पडत असून या लॉकडाउनला लोकांनी प्रतिसाद देण्यास सुरूवात केली आहे.

Post a Comment

0 Comments