आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ


आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ 

वेब टीम मुंबई ,दि. -२४ कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणानंतर शेअर बाजारता मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ११०० अंकांनी वधारला
आयकर परतावा भरण्यासाठी मुदत वाढीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार येत्या ३० जूनपर्यंत नागरिकांना आयकर भरता येणार आहे. २०१८-१९ वर्षाकरता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच उशीरा आयकर भरणाऱ्यांना १२ टक्केऐवजी ९ टक्के दंड आकारला जाणार आहे.
जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ
याशिवाय मार्च, एप्रिल, मे महिन्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतही वाढवून ३० जून करण्यात आली आहे. पाच कोटींहून कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना लेट चार्ज आणि दंड माफ करण्यात आला आहे. त्यापुढील उलाढाल असलेल्या कंपन्यांना ९ टक्के व्याज आकारले जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं.
'विवाद से विश्वास' ही योजनेलाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त १० टक्के भरण्याची गरज नाही. यामध्ये ३१ मार्चपासून ३० जूनपर्यंत कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही ३० जूनपर्यंत वाढवल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे
पुढील तीन महिन्यांसाठी (३० जून २०२०) कोणत्याही बँकेंच्या एटीएममधून डेबिट कार्डद्वारे पैस काढल्यास कोणातंही शुल्क आकारलं जाणार नाही. मिनिमम बॅलेन्स रिक्वायमेंट फी माफ करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments