भुकेलेल्यांना अत्यल्प दरात जेवण देणारी सामाजिक संस्था


भुकेलेल्यांना अत्यल्प दरात जेवण देणारी सामाजिक संस्था
हेल्पिंग हॅण्डस् फॉर हंगर्स ग्रुप

वेब टीम नगर,दि. २३ -भुके को  अन्न प्यासे को पाणी मिळालं. तर जगायला आणखीन काय हवे? आणि हीच सोय प्रेमदान चौकात नोबल हॉस्पिटलसमोर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या श्री. हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान संचालिक ‘हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप’च्यावतीने अत्यल्प दरात भोजन देण्यात येते. अवघ्या  २० रुपयात पोळी-भाजी व वरण-भात असे हे सुग्रास भोजन येथे उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर आठवड्यातील सहा दिवस वेगळेगळे मेनू येथे भुकेलेल्याना  दिले जाते. सोमवारी  सांबार भात, मंगळवारी वरण भात, बुधवारी  मसूर मख्खणी भात, गुरुवारी आमटी भात, शुक्रवारी साबुदाण्याची खिचडी, शनिवारी पुलाव, खिचडी, मसाले भात  असे हे मेनू अत्यल्प दरात म्हणजे २० रुपयात मिळते.
हा व्यवसाय नव्हे तर सेवा असल्याने अल्पावधित या संस्थेचे काम सर्वतोमुखी झाले आहे. या संस्थेचे  नाना भोरे,  संजय खोंडे, जितेंद्र मालू,  किशोर कुलकर्णी,  राजू मंगळराव, अ‍ॅड. लता वाघ, महावीर कांकरिया आणि इतर सहकारी मंडळी अत्यंत श्रद्धेने आणि आपुलकीने हे काम करतात. त्यांच्या मतेही सेवा म्हणजे देणार्‍याचेही समाधान आणि घेणार्‍यालाही समाधान प्राप्त होते, असे हे कार्य आजच्या कोरोना उपद्रवाने हादरलेल्या लोकांना नक्कीच उपयोगी आहे.  राजेंद्र मालू यांनी या कामासाठी स्वतःच्या मालकीची प्रेमदान चौकातील जागा विना मोबदला उपलब्ध करून दिली.
आज राज्यात १४४ कलम लागू आहे. जीवनाश्यक वस्तू वगळता सवर्च व्यवहार थंड आहे. मात्र, भुकेलेल्यांपर्यंत अत्यल्प दरात अन्न पोहचविण्याचे हे माध्यम आहे. विशेषतः कोरोना बाधित रुग्ण, इतर संशयित रुग्ण त्यांच्या सेवेसाठीचे डॉक्टश्र, परिचारिका, पोलिस आदींना दि. २०, २१ मार्च रोजी विनामुल्य २०० भोजन थाळी संस्थेने पुरविले आहे. डॉ. दिपक हॉस्पिटलमधून जशी मागणी झाली तशी ही सेवा देण्यात आली. सद्याही मागणीप्रमाणे भोजन देण्याची सेवा सुरु आहे, असे  नाना भोेरे व  संजय खोंडे यांनी ही माहिती दिली.
प्रशासनाने संधी दिल्यास निश्‍चित भुकलेल्यांना देण्यात येईल. कारण हा व्यवसाय नसून ती सेवा आहे आणि ही सेवा आजच्या आणिबाणीच्या प्रसंगी असावी, अशी अपेक्षा उभयतांनी व्यक्त केली.
या योजनेविषयी बोलताना  नाना भोरे म्हणाले, अनेक ठिकाणी शुभकार्याचा स्वयंपाक उरलेला असतो. ते उरलेले अन्न गरजुपर्यंत पोहचविण्यासाठी यंत्रणा असवी, असे वाटल्याने हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप  नावाची संघटना उभी केली. मग सुरुवात झाली ते उरलेले अन्न ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडून घेवून ते झोपडपट्टीत राहणार्‍या गरजूपर्यंत पोहचविण्यासाठी प्रक्रिया. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची होणारी हेळसांड दिसली. मग त्यांच्यासाठी स्वतःच जेवण देता येईल का? यावर मंथन सुुरु झाले. योजनेचा पूर्ण अभ्यास करून तिची अंमलबजावणी करेपर्यंत सप्टेंबर २०१९ उजाडले आणि त्यातून वरणभात फक्त १० रुपयात, अशी योजना सुरू करण्यात आली. मात्र महाराष्ट्रीय व्यक्तीला भाकरी किंवा चपाती शिवाय जेवण जात नाही, असे लक्षात आल्यानंतर २०  रुपयांत पोळी-भाजी आणि वरणभात असे सुग्रास भोजन देण्यात येऊ लागले. हे भोजन हेल्पिंग हॅन्डस् फॉर हंगर्स  ग्रुप च्या वतीने  यशस्वीरित्या चालविण्यात येत आहे.
वास्तविक पाहता या सुग्रास भोजनाच्या थाळीचानिर्मिती खर्च ४८ रुपये एवढा आहे. शिवाय कोणतेही शासकीय अनुदान व स्वीकारता योजना आता केवळ रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच नव्हे तर मागेल त्याला भोजन या तत्वावर सुरू आहे. सकाळी १० वाजता शिजवलेले अन्न शिल्लक असेपर्यंत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची क्षुधा भागविण्याचा प्रयत्न या संस्थेच्यावतीने केला जातो. सुरुवातील उरलेले अन्न आणून द्या, असे आवाहन संस्थेने केले होते. मात्र, नंतर असे लक्षात आले, असे अन्न घेणे यात लोकांना अपराधीपणाची भावना दिसायला लागली. मग त्या ऐवजी २० रुपयात सुग्रास जेवण मिळू लागल. या संस्थेचे असंख्य सभासद महिन्याला २०० रुपये या प्रमाणे वर्गणी देतात. त्यातून जमा होणार्‍या रक्कमेतून जेवणाचा खर्च भागविला जातो. त्यात दोन कुटुंबांना रोजगार निर्माण झाला आहे. रोजच्या जेवणाबरोबर पार्सल नेणार्‍या लोकांची संख्याही कमी नाही. आगामी काळात डबे पुरविणारे मुले उपलब्ध झाल्यास घरपोहच डबा देण्याची सोयही अल्पदरात उपलब्ध होईल शिवाय यात काही तरुणांना रोजगारही मिळेल.
सध्या रोज १०० ते १२५ व्यक्तींची क्षुधा या संस्थेमार्फत भागविली जाते. नजिक काळात होणार्‍या पोलिस भरतीच्यावेळी भरतीसाठी येणार्‍या मुलांमुलींना अत्यल्प दरात भोजन देण्याची तसेच रंगारगल्ली मंगल कार्यालय, खाकीदास बाबा मठ या ठिकाणी सोय करण्याचा संस्थेचा मानस आहे. व आरोग्य सेवक,, गार्ड, तेथील सुरक्षारक्षक.
सध्या कोरोना या विषाणूची साथ सुरू असून दीपक हॉस्पिटलमध्ये विलगीकृत केलेल्या व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्सला करावयास सांगण्यात आल्याने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून ४० जणांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय या संस्थेने मोफत केली आहे. त्यानंतर ही दुसर्‍या दिवशी ही दोन वेळा १३५ जणांची भोजनाची व्यवस्थत्त केली होती. या दोन दिवसात २०० जणांची येथे व्यवस्था केली होती.
संबंधित रुग्ण, स्टाफ, डॉक्टर, परिचारिका आदींना जेवणाची सेवा संस्थेने दिली. राहुरीच्या लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल मागितल्याने त्याही पुरविण्यात आल्या. त्यानंती २२ मार्चच्या जनता कर्फुमध्ये शहरात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचीही नाष्टा किंवा जेवणाची व्यवस्थत्त करण्याचे नियोजन होते. पण तशी मागणी झाली नाही, ही खंत आहे, असे  खांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments