कर्म कर्तव्य पार पाडतांना समाजासाठी काही करावे तो प्रयत्न सुरु आहे



कर्म कर्तव्य पार पाडतांना समाजासाठी काही करावे ,प्रयत्न सुरु आहे

 कांचन येवले - पुणे विद्यापीठ सुवर्णपदक पदवी प्राप्त 

वेब टीम नगर,दि. २३ -कर्म कर्तव्य पार पाडतांना समाजासाठी काही करावे, अशी प्रेरणा मिळाली आणि मी प्रयत्न सुरु केेले आहे, असे पुणे विद्यापीठाची पदवीत्तर प्राप्त सुवर्णपदक विजेत्या कु.कांचन येवले हिने सत्काराला उत्तर देतांना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या, कुटूंबाच्या ऋणातून अल्पसा का होईना मुक्त होता आले आणि शिक्षक मार्गदर्शकांप्रमाणे आपणासारख्या ज्येष्ठांचे आशिर्वादाची जाणिव ठेवता आली तर हे यश जीवनाला प्रेरणा देणारे ठरेल. हे यश नम्रमणे स्वीकारले आहे, असेही त्या म्हणाल्या.
भिंगार काँग्रेस पक्षाच्यावतीने कांचन हिचा तिच्या भूषणनगर (केडगांव) येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, बुके असे सत्काराचे स्वरुप आहे. पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त कांचन येवले या सामान्य कुटूंबातील मुलींचे यश इतरांना प्रेरणा देणारे असेच आहे, असे मत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांनी व्यक्त केले. येवले हिने समाजासाठी आपल्या ज्ञानाचा सर्वसामान्यांना उपयोग करुन द्यावा, कर्तव्य पार पाडतांना आणि यापुढेही शिक्षण घेतांना त्याचा भार कुटूंबावर पडू नये, असे नियोजन करावे, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पूर्वीचे पिटीशन रायटर आता कॉम्प्युटर ऑपरेटरच्या माध्यमातून ही भुमिका बजावतात. विवेक येवले हे असेच ऑपरेटर आहे ते कवीही आहेत. कांचन ही त्यांची कन्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एम.ए.मराठी परिक्षेत त्या विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकाविणार्या ठरल्या. नगर येथील राधाबाई काळे कन्या महाविद्यालयाची कांचन ही विद्यार्थीनी.
प्रभारी कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी व प्रा.डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते पुणे येथे पदवीदान समारंभात येवले हिचा गौरव करण्यात आला होता, अशी माहिती विवेक येवले यांनी यावेळी दिली.  अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांच्या हस्ते कांचन हीचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे सदस्य शामराव वाघस्कर, ॲड.नरेंद्र भिंगारदिवे यांनीही कांचन हीच्या यशाचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ॲड.भिंगारदिवे यांनी शेवटी आभार मानले.

Post a Comment

0 Comments