कामगारांचे पगार कापू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन


कामगारांचे पगार कापू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन

वेब टीम नवी दिल्ली,दि. १९ - देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील जनतेला ८ वाजता संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळा असे आवाहन केले. यावेळी “सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील आवाहन आहे की, तुम्ही ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांचा पगार कापू नका,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“दूध, खाण्या-पिण्याचे सामान, औषध किंवा जीवनावश्यक वस्तूंची  गोष्टी तूट भासू नये यासाठी अनेवश्यक पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे त्यांचा साठा करु नका,” असेही मोदी म्हणाले.
“कोरोनापासून उत्पन्न होणाऱ्या आर्थिक तूट लक्षात घेता अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारने ‘कोविड १९टास्क फोर्स  तयार करण्यात येणार आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“हे टास्क फोर्स देशातील आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी जी आवश्यक पावलं उचलेल. ज्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल,” असेही मोदी म्हणाले.
“जर शक्य असेल तर प्रत्येक दिवशी कमीत कमी १० लोकांना कोरोना विषाणूंपासून बचावाचे उपाय सांगा. त्यासोबत जनता कर्फ्यूबाबतही सांगा,”
“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी, जनतेद्वारे लावण्यात आलेला कर्फ्यू, येत्या रविवारी म्हणजे २२ मार्चला जनता कर्फ्यू करा. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूबाबत जनजागृती करा, शक्य तितक्या लोकांना माहिती द्या,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“जे आपत्कालीन सेवेत काम करतात त्या सर्वांचे संध्याकाळी ५ वाजता धन्यवाद माना. संध्याकाळी ५ वाजता आपल्या घराच्या दरवाज्यात, खिडकीत, बाल्कनी ५मिनिटे उभे राहून त्यांचे आभार व्यक्त करा,” असेही मोदी म्हणाले.
“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील व्यक्तींना आवाहन आहे की, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेता त्यांचा पगार कापू नका,” असेही नरेंद्र मोदी  म्हणाले.

Post a Comment

0 Comments