प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी ‘नारी गौरव सन्मान पुरस्कार’ प्रदान


प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी ‘नारी गौरव सन्मान पुरस्कार’ प्रदान

    वेब टीम नगर,दि. १६ - पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी अध्यापन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हिमाक्षरा राष्ट्रीय साहित्य परिषद, वर्धा या भारत नावाजलेल्या संस्थेच्यावतीने गुजराथमधील बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विश्‍व विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराज सयाजीराव गायकवाड विश्‍व विद्यालयाच्या कुलाधीपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते ‘नारी गौरव सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी कुलपती प्रा.परिमल व्यास, हिमक्षरा राष्ट्रीय साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.इसरार गुनेश,  समन्वयक डॉ.कल्पना गवळी, महासचिव डॉ.वर्षा आदि उपस्थित होते.

     डॉ.अमरजा रेखी यांना यापुर्वीही शैक्षणिक कार्यात केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या नारी गौरव सन्मान पुरस्काराबद्दल डॉ.अमरजा रेखी यांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी सचिव सुनिल रामदासी, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड.अनंत फडणीस आदिंसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments