कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ३९ वर


राज्यातील कोरोना  दुसऱ्या स्टेज चा 

कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ३९ वर 

वेब टीम मुंबई ,दि. १६- राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं  आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची स्टेज २ आहे. कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे. यातील १८ ते १९ व्यक्ती परदेशातून आलेले आहे. तर इतर लोक हे त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

“चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांसह युएस, सौदी अरेबिया, दुबई या देशांचाही या यादीत समावेश केला आहे. या देशातून येणाऱ्यांना A,B, C या यादीत विभागणी केली जात आहे. तसेच यात जे व्यक्ती होम कोरेनटाईन केलं जात आहे त्यांच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का असेल. त्यामुळे जर तो व्यक्ती घराबाहेर पडला तर त्याला ओळखता येणे शक्य होईल,” असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळाही बंद करण्याचे आदेश आहेत. तसेच रेल्वे स्टेशन दिवसातून दोन वेळा धुण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय सर्व स्टेशनच्या वॉशरुममध्ये साबण, सॅनिटायझर ठेवा अशाही सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

“त्याशिवाय मंत्रालयात कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्यांना मनाई केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जास्त लोकांना ऑफिसमध्ये बोलवू नका. तसेच निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलाव्या अशा सूचना केल्या आहे. निवडणुकांच्या बाबत सर्व पालिका, नगरपंचायत इतर सर्व निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकण्यात याव्या अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्याचा निर्णय झाला आहे.” असेही राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड – ९
पुणे – ७
मुंबई – ६
नागपूर – ४
यवतमाळ – ३
कल्याण – ३
नवी मुंबई – ३
रायगड – १
ठाणे -१
अहमदनगर – १
औरंगाबाद – १
एकूण ३९
‘कोरोना’पासून बचावासाठी गणपती बाप्पालाही मास्क

“पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. राज्यात जेवढ शक्य आहे, तेवढी जनजागृती करा,” असेही ते यावेळी म्हणाले.

“दहावी आणि बारावी परीक्षा थांबवण्याबाबत कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोणतंही शहर पूर्ण लॉग डाऊन किंवा शट डाऊन करणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला याबाबतचे गांभीर्य आहे. त्यामुळे ज्या सूचना आहेत त्यांचे तंतोतंत पालन करा,” असेही आरोग्यमंत्र्यांनी  सांगितले.

Post a Comment

0 Comments