संपादक ,पत्रकारांच्या समस्यांबाबत आवाज उठवू


संपादक ,पत्रकारांच्या समस्यांबाबत आवाज उठवू

किसनभाऊ हासे : जिल्हा पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या जाहिर   

वेब टीम नगर,दि. १६-  आपली संघटना ही संपादक आणि पत्रकार यांच्या  समन्वयातून जनतेसाठी आवाज उठवणारी असून आपल्या नोंदणीकृत संघटनेचे मुंबईत कार्यालय आहे. क वर्ग आणि साप्ताहिकांच्या जाहिरात प्रश्नी पत्रकार व संपादक सेवा संघाच्या म्हणण्या नुसारच शासनाने राजपत्र काढले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्यवस्थित पार पडू शकल्या .पत्रकारांच्या तसेच संपादकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्य माध्यमातून आवाज उठवत राहू . असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष किसनभाऊ हासे यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य पातळीवरील संपादक व पत्रकार सेवा संघ या नोंदणीकृत संघटनेच्या राज्य समन्वय  समितीची बैठक संघटनेचे अध्यक्ष ,दै.  युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे ,राज्य समन्वयक लचके  यांच्या उपस्थित तसेच निमंत्रक  प्रकाश भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हॉटेल सुवर्णम प्राईड मध्ये पार पडलेल्या
या बैठकीस शहर व जिल्ह्यातील ४० पत्रकार,संपादक उपस्थित होते. या संवाद बैठकीत राज्यातील पत्रकारांना महाराष्ट्र सरकार विशेषतः क वर्ग जिल्हापत्रे ,साप्ताहिके,पाक्षिके, मासिके यांना जाहिराती देतच नाही. त्यांच्या जाहिराती बंद केल्यामुळे  राज्यातील छोट्या वृत्तपत्राची मुस्कटदाबी झाली आहे.

शासनाने प्राधान्याने छोट्या वृत्तपत्रांच्या जाहिराती चालू कराव्यात राज्य सरकारच्या सर्व योजनांची व प्रसिद्धी पत्रकांची राज्यभर शासनाची माहिती मुद्रित माध्यमातून  दिली जाते . माध्यम आज उपाशी आहे त्यांना उपाशी ठेऊन पूर्वीच्या सरकारने व माहिती संचालकाने जी घोडचूक केली आहे ती सध्याच्या सरकारने दुरुस्त करावी राज्यातील गरजू पत्रकार संपादक यांना ३५-६० वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांना  शासनाने अद्याप निवृत्ती वेतन लागू  केलेले नाही
राजुरातील पत्रकारांना तातडीने निवृत्ती वेतन लागू व्हावे गरजू , नियमात बसणाऱ्या पत्रकारांना आरोग्य सेवा लागू करावी एस.टी ,रेल्वे व शिवनेरी मधून सर्व पत्रकारांना व अधीस्वीकृतीधारकांना तात्काळ सवलती द्याव्यात. यावेळी लचके , दीपक मेढे , राजेश सटाणकर , कारण नवले , नंदकुमार सातपुते आदींनी पत्रकारांच्या व्यथा मांडल्या . निमंत्रक भंडारे यांनी पत्रकारांना अर्थ , आरोग्य , गृह योजना साठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेच्या राज्य सल्लागार पदी प्रकाश भंडारे , जिल्हा कार्याध्यक्ष पदी दीपक मेढे , उपाध्यक्ष विठ्ठल शिंदे , समन्वयक रियाज शेख , इरफान खान , आदींना नियुक्ती पत्रे देण्यात अली पोलीस अभियोक्ता पदी निवडझाल्या बद्दल मनीषा शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . शेवटी संध्या मेढे यांनी आभार प्रदर्शन केले . 

Post a Comment

0 Comments