देशात ७४ तर राज्यात १७ जण कोरोना बाधित


देशात  ७४ तर, राज्यात १७ जण कोरोना बाधित 

वेब टीम पुणे,दि. १३-  राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेहून पुण्यात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या १० वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त्यांनी दिपक म्हैसकर यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे विभागीय आयुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ४ मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा कोणीही अनावश्यक साठा करु नये. जर केल्यास तशी कारवाई करण्यात येईल. सध्या ३११ जण निगराणीखाली आहेत.
पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं आहे. त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. असेही पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
कोरोनासंबंधी चुकीची बातमी व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी  सांगितले.

 पुण्यात सर्व शाळांना सुट्टी, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये थिएटर्स, जिम बंद : मुख्यमंत्री

कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.
यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण

पुणे – १०
नागपूर – ३
मुंबई – ३
ठाणे – १
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (२) – ९ मार्च
दाम्पत्याची मुलगी – १० मार्च
नातेवाईक – १० मार्च
टॅक्सी चालक – १० मार्च
मुंबईतील सहप्रवासी (२) – ११ मार्च
नागपुरात १ – १२ मार्च
पुण्यात आणखी एक – १२ मार्च
पुण्यात ३ – १२ मार्च
ठाण्यात एक – १२ मार्च
मुंबईत एक – १२ मार्च
नागपुरात २ – १३ मार्च
पुण्यात १ – १३मार्च

Post a Comment

0 Comments