अंगणवाडीच्‍या खोल्‍यासाठी आमदार निधीतून रक्‍कम देणार
अंगणवाडीच्‍या खोल्‍यासाठी आमदार निधीतून रक्‍कम देणार


 बाळासाहेब थोरात - आदर्श अंगणवाडी, पर्यवेक्षिका, सेविका मदतनीस पुरस्‍कार वितरण

        वेब टीम नगर दि.८-  महिलांना महाराष्‍ट्रात आरक्षणाबाबत प्रथम प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. महिला संसार चांगले सांभाळतात. त्‍या संस्‍थासुध्‍दा चांगल्या पध्‍दतीने सांभाळू शकतात. त्‍याचप्रमाणे ग्रामीण भागात  सरपंच म्‍हणूनही उत्‍कृष्‍ट काम करतात, असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.  अंगणवाडीच्‍या खोल्‍यासाठी आमदार निधीतून रक्‍कम देणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्‍त एकात्मिक बाल विकास सेवा योजना व जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बाल‍कल्‍याण विभागामार्फत जिल्‍हयातील अकोले, राजूर, संगमनेर, घारगाव १ व २, जामखेड, कोपरगाव, राहाता, श्रीगोंदा, बेलवंडी, श्रीरामपूर, कर्जत,  शेवगाव, पाथर्डी  नेवासा, वडाळा, राहुरी, पारनेर, नगर ग्रामीण, नगर २  व भिंगार  असे २१ प्रक्‍लपातील आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका,  सेविका व मदतनीस यांना महसूल मंत्री थोरात यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार वितरण करण्‍यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
          आमदार सुधीर तांबे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा राजश्रीताई घुले पाटील,  उपाध्‍यक्ष प्रताप शेळके, मुख्‍य कार्यकारी अधिकारी  जगन्‍नाथ भोर,  उप विभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून, तहसीलदार उमेश पाटील, समाज कल्‍याण सभापती उमेश परहर, अर्थ समिती व पशुसंवर्धन व दुग्‍धविकास समिती सभापती सुनिल गडाख, कृषी बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते, महिला  व बाल कल्‍याण समिती सभापती मिराताई पांडूरंग शेटे, सदस्‍या रोहिणीताई निघुते, पुष्‍पाताई दिपक रोहोम, राणीताई निलेश लंके  व पंचायत समितीचे सभापती आदि मान्‍यवर उपस्थित होते.
       महसूल मंत्री  थोरात म्‍हणाले, जागतिक महिला दिनानिमित्‍त जिल्‍हयाचे नेतृत्‍व महिलाच्‍या हाती असून ते कौतुकास्‍पद आहे. त्‍यांचे अभिनंदन केले पाहिजे.
आमदार  तांबे म्‍हणाले, महिलांना  सन्‍मानाने वागणूक दिली पाहिजे. समाजातील महिलाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन बदला पाहिजे. महिलांना अधिक महत्‍व असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा  घुले म्‍हणाल्‍या,  जिल्‍हयातील अंगणवाडीमध्‍ये काम करणा-या महिलांचे त्‍यांनी कौतुक केले. कारण दुर्गम भागातही चांगल्‍या पध्‍दतीने सेविका काम करतात असे त्‍यांनी यावेळी सांगितले.
प्रस्‍ताविकात मुख्‍य कार्यकारी अधिकारी जगन्‍नाथ भोर म्‍हणाले, जिल्‍हा परिषदेच्‍या अंगणवाडीमध्‍ये  कार्यरत असलेल्‍या सेविकांचे काम चांगले आहे. तसेच पोषण आहार पंधरवडयात बालकांना पोषण आहाराविषयी जनजागृती करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
            महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती  शेटे म्‍हणाल्‍या,  जिल्‍हयात २१ प्रकल्‍पांतर्गत ५ हजार ५ पाचशे ५५  अंगणवाडी केंद्र असून अंगणवाडीमध्‍ये चांगले काम करणा-या महिलांना आदर्श पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे. अंगणवाडी केंद्राविषयी सविस्‍तर माहिती सांगितली.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अकोलेचे बाल विकास प्रकल्‍प अधिकारी आरती गांगर्डे  केले. यावेळी जिल्‍हयातील आंगणवाडीतील पर्यवेक्षका, सेवका व मदतनीस मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments