कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही

कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही

कोणी काहीही म्हणो,  या सरकारला कोणताही धोका नाही, अजित पवरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

वेब टीम पुणे,दि. ७- “कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील मावळ मधील एका खाजगी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, असं अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
 महाविकासआघाडीचे सरकार व्यवस्थित काम करत आहे. कोणी काहीही म्हणो, मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, या सरकारला कोणताही धोका नाही”, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारला धोका असल्याच्या विरोधकांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिलं.
मी जिल्ह्याचा पालकमंत्री, मला लक्ष ठेवणे आवश्यक
“महापालिका परिसरातील जनतेच्या लक्षात एक गोष्ट आली नाही. मी इतका विकास केला. वीस वर्षे जनता मला पाठबळ देत होती. नरेंद्र मोदींची लाट आली, आमच्यातले तिकडे गेले. त्यांची सत्ता आली. तीन वर्षात काय अवस्था आहे. भ्रष्टाचार सुरु आहे”, असा आरोप अजित पवारांनी केला.
“राष्ट्रीयीकृत बँकेतून पैसे काढून खाजगी बँकेत पैसे ठेवण्याचं काहीही कारण नव्हतं. उद्या बँक अडचणीत आली, तर जनतेचा पैसा कोण भरुन देणार? आत्ताच (महापालिका) सरकार त्याला जबाबदार आहेत. माझ्या हातात सत्ता होती, तेव्हा मी स्वतः लक्ष देत होतो. महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर आणि मुंबईला गेल्यानंतर नगरविकास खात्याकडून मी माहिती घेणार आहे. शेवटी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मला लक्ष ठेवणे गरजेचे आहे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येस बँकेप्रकरणावर दिली.

Post a Comment

0 Comments