थोडक्यात पण महत्वाचे .......

थोडक्यात पण महत्वाचे  

जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटर्स डान्स अ‍ॅकॅडमीच्या 

वतीने  मोफत झुंबा डेमो  वर्कशॉप


    वेब टीम  नगर,दि. ७-  जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटर्स डान्स अ‍ॅकॅडमी ड्रेपरी  व झुंबा फिटनेसच्या वतीने मोफत झुंबा डेमो क्लास वर्कशॉप दिल्लीगेट येथे दि.८ मार्च रोजी दु.५ वा. ते रात्री ८ वा.या वेळेत आयोजन करण्यात आले आहे हे  वर्कशॉप फक्त महिला व मुलींसाठी असून येणार्‍या सर्व महिलांना झुंबा डान्सची सर्व माहिती, फायदे व प्रात्याक्षिक दिले जाईल. तसेच आहाराविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे.
     या शिबीरात प्रशिक्षण झीन शरन भोगल  स्वत: देणार असून सर्व नगर शहरातील महिला व मुलींनी या प्रशिक्षण शिबीरात  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रिएटर्स डान्स अ‍ॅकॅडमी ड्रेपरी व झुंबा फिटनेसच्या संचालक दिनेश फिरके यांनी केले. अधिक माहितीसाठी ८१४९९९९१४९,७९७२५८४७७९  या क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शाम जाधव


    वेब टीम नगर ,दि. ७-  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नगर जिल्हा उपाध्यक्षपदी शाम जाधव यांची निवड पिंपळनेर (ता.पारनेर) येथील नाभिक समाजाच्या मेळाव्यात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
     पिंपळनेरच्या झालेल्या नाभिक समाजाच्या मेळाव्यात शाम जाधव यांनी केलेल्या कार्याची दखल नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी घेतली त्यांच्या सूचनेनुसार आपण जाधव यांची उपाध्यक्षपदी  नियुक्ती केल्याचे बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.
     या मेळाव्यास पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, जि.प.सदस्या राणीताई लंके, पिंपळनेरच्या सरपंच शितल रासकर, माजी जि.प.सदस्य विश्‍वनाथ कोरडे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीतच पारनेर युवा तालुकाध्यक्षपदी प्रसाद भोसले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
     बाळासाहेब भुजबळ यांनी या दोन्ही निवडीबद्दल समाधान व्यक्त केले. पारनेर तालुक्यात शाम जाधव व प्रसाद भोसले यांनी समाज एकत्रिकरण, वधू-वर सूचक मेळावे, जनगणना प्रकरणी महत्वाची भुमिका, संत सेना महाराज मंदिर उभारणी व सभामंडपासाठी पाठपुरावा केला अशा या कार्यामुळे त्यांची निवड सार्थ ठरली, असे सांगितले.
     यावेळी संघटनेचे भाऊ बिडे, शाम साळूंके, विनायक कुटे, सुनिल आतकर, माऊली गायकवाड, रमेश बिडवे,वनिता बिडवे, चंद्रक़ांत काशिद, बापू औटी, सोमनाथ कदम आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीचे पारनेर तालुक्यातून स्वागत होत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------


श्री ज्ञानसरस्वती संगीत निकेतनचे गायन-वादन परिक्षेत यश

    वेब टीम नगर,दि. ७ - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने नोव्हें-डिसें. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या गायन व वादन परिक्षेत कोर्टगल्ली येथील श्री ज्ञानसरस्वती संगीत निकेतनमधील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून, निकेतनचा १०० टक्के निकाल लागला आहे.
     यामधील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे: प्रारंभिक परिक्षेत मृण्मयी सोळंके सिंथेसायझर वादनात प्रथम श्रेणीत, स्नेहल सांगळे हार्मोनिअम वादनात विशेष योग्यतेसह केंद्रात तिसरी, मैथिली सोळंके गायनात प्रथम श्रेणीत केंद्रात पाचवी, श्रीजा बॅनर्जी व लिजा बॅनर्जी गायनात विशेष योग्यतेसह केंद्रात दुसर्‍या, ओजस गुजराथी सिंथेसायझर वादनात विशेष योग्यतेसह केंद्रात प्रथम आला आहे. तसेच परिक्षा प्रवेशिका पूर्णमध्ये ज्ञानेश्‍वरी रणसिंग हार्मोनियम वादनात प्रथम श्रेणीत, प्रतिक्षा तुपे गायन विषयात प्रथम श्रेणीत. त्याचप्रमाणे मध्यमा प्रथम : परिक्षेत साक्षी भुकन हार्मोनियम वादन विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालिका संपदा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले असून, सर्व विद्यार्थ्यांचे शहरात अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments