रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे



रक्तदान करुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे 

डॉ.विलास मढीकर : श्रीमंत बालाजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ४८ युवकांचे रक्तदान

वेब टीम नगर,दि. ६ - आजच्या धावपळीच्या युगामध्ये कित्येक आजारांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्ताची गरज खुप जास्त तुटवडा पडतो. आज तरुणांनी पुढे येवुन रक्तदान केले पाहिजे. त्यामुळे येणारे संकट टळू शकते. धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक मंडळाने हा रक्तदान शिबीर घेवुन सामाजिक कर्तव्य पार पाडावे. त्यामुळे मानवास मदत होईल, आणि कित्येक जणांचे प्राण वाचू शकेल, असे प्रतिपादन विलास मढीकर यांनी केले
     श्रीमंत बालाजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.विलास मढीकर बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा, अध्यक्ष आनंद गोंधळे, उपाध्यक्ष नरेश कोडम, शुभम गुरुड, गणेश बोगा, शैनक बल्लाळ, प्रणव बोगा, आदित्य परदेशी, ओम जिंदम, प्रथमेश बोगा, ओंकार दंडी, श्रेयश दंडी, प्रज्वल बिज्जा, नरेश यलदी, अक्षय दंडी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
     यावेळी प्रास्तविक भाषणात अध्यक्ष आनंद गोंधळे म्हणाले कि, धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्यावतीने करण्यात आला. रक्ताची गरज ओळखुन मंडळाच्या वतीने ८ वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येतो. यामध्ये तरुण, महिलांचा मोठा सहभाग असतो. पंचरंग युवक मंडळचे सर्व युवक सामाजिक कार्यात नेहमी उत्स्फुर्त सहभागी होत असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
     यावेळी जनकल्याण रक्त पेढीच्या सहाकार्यने रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. यावेळी४८ युवकांनी रक्तदान करुन सामाजिक संदेश दिला. शिबीर यशस्वीतेसाठी पंचरंग युवक मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद बोगा यांनी केले. तर आभार चंद्रकांत अल्ली  यांनी मानले.

Post a Comment

0 Comments