मुस्लिम आरक्षणाचा कायदा केल्यास विश्वहिंदू परिषदेतर्फे तीव्र आंदोलन

मुस्लिम आरक्षणाचा कायदा केल्यास विश्वहिंदू परिषदेतर्फे तीव्र आंदोलन

- पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसंहमंत्री विवेक कुलकर्णी                                                                                                                                 
         वेब टीम नगर,दि. ५ -महाविकास आघाडीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ५टक्के  मुस्लिम आरक्षणाचा कायदा लागू करण्याबाबत विधान केले आहे.हे सरकार मुस्लीमांना धर्माच्या नावाखाली आरक्षण देत आहे.ही गोष्ट असंविधानीक असून त्यामध्ये सध्याच्या आरक्षण लागू असलेल्या मागासवर्गीय बहुजन हिंदू बांधवांवर अन्याय होणार आहे.व त्यांच्या आरक्षणावर गदा येणार आहे.           
आरक्षणाचा संविधानिक हक्क वाचवण्यासाठी विश्वहिंदू परिषद लढा देईल.मुस्लिम आरक्षणाचा कायदा सरकारने केल्यास विश्वहिंदू परिषदेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसंहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिला.                                                                                             
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचे आरक्षण देऊ नये असे नमूद केले आहे.मुस्लिम समाजाला हे आरक्षण दिल्यास हिंदू,बौद्ध,जैन या घटकांवर अन्याय होईल.मतांच्या राजकारणासाठी सरकार संविधानालाही धक्का लावण्याच्या स्थितीत दिसत आहे.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांसोबत जायचे कि औरंगजेबाच्या अनुयायांसोबत जायचे हे सरकारने ठरवावे.                                                                                                                   देशी गोमातेचे हिंदू धर्मातील स्थान मातेसमान आहे.गाईला वैज्ञानिक दृष्ट्या महत्व आहे.गो हत्या बंदी कायदा होऊन ही या सरकारच्या काळात दररोज अनेक गोमातांची कसाई मार्फत हत्या केली जाते.तत्कालिन सरकार गाईच्या विषयी कायदे बंद करणार असल्याचे समजले आहे.गोसंवर्धनासाठी कायदाची कडक अमलबजावणी करण्यात यावी.अन्यथा बजरंग दलाच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल. असे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसंहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments