अहमदनगर कॉलेजचे विविध स्पर्धेत यश


अहमदनगर कॉलेजचे विविध स्पर्धेत यश

    वेब टीम  नगर,दि. ५ - कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचेगांवच्यावतीने आयोजित काव्य वाचन स्पर्धेत अहमदनगर कॉलेजच्या एम.एस्सी.चा विद्यार्थी शंकर शिंदे व चारुशिला वैद्य हिने यशस्वीरित्या सहभाग घेतला. या स्पर्धेत शंकर शिंदे यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तसेच आयएमएस अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये टीवाय बीए चा विद्यार्थी कमलजित सिंग व अतुल कुमार यांनी सहभाग नोंदविला होता, यात कमलजित सिंग यास वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तर प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाले.
     शंकर शिदे व कमलजित सिंग या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे प्रमुख प्रा.अशोक बोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments