माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्दम यांचा पसायदान ग्रुपतर्फे सत्कार
वेब टीम नगर,दि. ५ - श्री मार्कंडेय विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक व मार्कंडेय गृहनिर्माण संस्थेचे प्रवर्तक बाळकृष्ण सिद्दम यांनी वयाची 75 वर्षे नुकतीच पूर्ण केल्याने त्यांचा पसायदान ग्रुपतर्फे मित्र मंडळीने हार्दिक सत्कार केला. त्यांना शाल,श्रीफळ व हार घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या सत्काराबद्दल बोलतांना उत्तर देतांना बाळकृष्ण सिद्दम यांनी परमेश्वराने शक्ती आणि बुद्धी दिली, त्याप्रमाणे सत्कार्य करत गेलो आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कामगार क्षेत्रात काम करत गेलो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी रोजच भेटणार्या मित्र मंडळींतर्फे, पसायदान ग्रुपतर्फे सिद्दम यांचा अचानक सत्कार झाल्याने सिद्दम ही भारावून गेले. यावेळी प्रख्यात अॅड.डि.डि.घोरपडे, निवृत्त दारुबंदी प्रचार अधिकारी शेळके, पत्रकार प्रकाश भंडारे, देशमुख , मॉर्डन हायस्कूलचे मुळे आदिंनी सिद्दम यांच्या बद्दल कौतुकाचे शद्ब व्यक्त करुन त्यांना उत्तोत्तर दिर्घाआयु व आरोग्य लाभावे, अशी सर्वांनी प्रार्थना केली. पसायदान ग्रुपतर्फे सर्व सदस्य व पाहुण्यांना अल्पोहार देण्यात आला.
0 Comments