प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्यांसाठी संजीवनी



प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्यांसाठी संजीवनी

 वसंत लोढा : श्रीमंत बालाजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पंचरंग युवक मंडळाचा उपक्रम

   वेब टीम नगर,दि. ५ - आज महागाईच्या काळात आरोग्य तपासण्यासाठी करण्यासाठी गरीब व गरजू रुग्णांना खर्च परवडत नाही. त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सामान्यांसाठी संजीवनी आहे. त्यामुळे नक्कीच गरजू रुणांना याचा लाभ होवुन त्यांच्या आरोग्य उत्तम राहिल, असे प्रतिपादन पंडित दिनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
     श्रीमंत बालाजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पंचरंग युवक मंडळाच्यावतीने नागरीकांसाठी अनुलोम सामाजिक संस्थेच्या सहाकार्याने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत मोफत गोल्ड कार्ड वाटप शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. लोढ बोलत होते. यावेळी नगरसेवक मनोज दुलम,  माजी नगरसेवक धनंजय जाधव, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा, अनुलोम शहरप्रमुख राजेश्‍वर श्रीराम, चंद्रकांत चिलका, देवीदास कोडम, मधुकर गुंटूक, शंकर दंडी, काशिनाथ बोगा, गौरव चिलका, मंडळाचे अध्यक्ष आनंद गोंधळे, उपाध्यक्ष नरेश कोडम, सागर गोंधळे, अमोल दंडी, शंशाक बोगा, महेश रोल्ला, हर्षल आडेप, रोहित येनगुंपटला, ओंकार आडेप, संतोष येरला, संजय बोगा आदींसह मंडळाचे कार्यकर्तˆमोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी प्रास्तविका मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा यांनी सांगितले कि, गेल्या 8 वर्षापासून श्रीमंत बालाजी गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवुन हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. जेणे करुन या धार्मिक उत्सवातुन गरीब - गरजुंना मदतीचा हात मिळावा, हाच उद्देश ठेवुन मंडळाच्यावतीने वर्षभर विविध उत्सव साजरा करण्यात येतात, असे सांगितले.
     यावेळी नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक धनंजय जाधव, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा, अनुलोम शहरप्रमुख राजेश्‍वर श्रीराम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबीरात २५० नागरीकांना मोफत गोल्ड कार्ड वाटप करण्यात आले. कार्ड वाटपसाठी मनोज भुजबळ यांनी काम पाहिले.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद बोगा यांनी केले. आभार शंकर जिंदम यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी पंचरंग युवक मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments