उज्वल भवितव्यासाठी सुरक्षितता हि संस्कृती सर्वानी जोपासावी

उज्वल भवितव्यासाठी सुरक्षितता हि संस्कृती सर्वानी जोपासावी -उपसंचालक  स्वप्नील देशमुख


वेब टीम नगर ,दि. ५-सुरक्षितता हि सामाजिक असो ,वैयत्तिक असो ,औद्योगिक किंवा कोणत्याही स्वरूपाची असो हि सुरक्षितता  व्यक्ती सापेक्ष असून यासाठी सर्वांनी कायम सतर्क राहून ,त्यास अग्रक्रम देवुन,,आपली जबाबदारी समजून सुरक्षिततेची संस्कृती जपावी असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख यांनी केले .लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये ४९ व्या  औद्योगिक सुरक्षा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते  या औद्योगिक सुरक्षा विषयक बोधवाक्य हे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा  वापर करा परंतु स्वस्थ व आनंदी  जीवनासाठी सुरक्षिततेला  अधिक प्राधान्य द्या असे आहे  ,या प्रसंगी सुरक्षा झेंडयाचे अनावरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात येऊन सुरक्षा सप्ताहाचे  उदघाटन करण्यात आले .
 याप्रसंगी कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर व कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सुरवातीला सुरक्षा विभाग तर्फे शैलेंद्र भालेकर यांनी सर्वांचे स्वागत करून चार ते अकरा मार्च या सुरक्षा सप्ताहात आयोजित विविध उपक्रमाची माहिती दिली .
अरविंद पारगावकर यांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीमध्ये स्थापनेपासूनच सुरक्षितता यास परतुं प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून दरवर्षी  सुरक्षितता वाढीस लावण्यासाठी, त्यातील गंभीरता समजून जागरूकता वाढीसाठी सातत्याने सुरु असलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर विवेचन केले व आपण सुरक्षित तर आपले कुटुंब अधि-काधिक सुरक्षित व आनंदी हि बाब सर्वानी लक्षात घ्यावी असे आवाहन करून  काम करताना किंवा प्रवास करताना नियमाच्या पालनाबरोबर सुरक्षा उपकरणे सर्वांनी वापरावीत .व हे न वापरल्यास काय होते ,काय फरक पडतो.असा फाजील आत्मविश्वास बाजूला ठेवावा असे       आवाहन केले .
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश चांडक, ,अविनाश मांडे तसेच कामगार सेनेचे प्रमुख किरण देशमुख यांनी सुरक्षितते विषयक आपले विचार मांडले .शैलेंद्र भालेकर यांनी सर्वांना औद्योगिक सुरक्षा विषयक शपथ दिली ,                 
उपसंचालक स्वनिल देशमुख यांनी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे आभार मानले ते म्हणाले कि सध्याच्या अत्याधुनिक मशिनरीच्या युगात सुरक्षितता हि अतिशय महत्वाची   बाब असून अश्या सप्ताहाच्या आयोजन मागे सुरक्षिततेविषयी अधिक - अधिक सुरक्षितता वाढीस लागावी एव्हढाच उद्धेश असून यातील सातत्यता वाढवी यासाठी वर्षातून असे सप्ताह आयोजित केले जातात ,यासाठी सर्वच कंपनीतील अधिकारी, कामगार ,कर्मचारी यांनी छोट्या- छोट्या अपघाताकडे  दुर्लक्ष न करता त्याकडे गंभीरता पूर्वक पाहिले पाहिजे जेणे करून अपघात विरहित कंपनी हि संकल्पना वाढीस लागेल ,व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये,कुटुंबामध्ये   आनंदाची निर्मिती होईल असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या .मानव संसाधन विभागाचे प्रमुख श्रीकांत गाडे यांनी आभार मानले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव निमसे ,ईश्वर हांडे , चैतन्य खानवेलकर  ,ताराचंद ठोकळ ,दत्तात्रय बोरुडे ,संजय भुजबळ ,रवींद्र भावसार ,निलेश माने ,चंद्रकांत भांडारी यांनी परिश्रम  घेतले 

Post a Comment

0 Comments