सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली चांदबिबी महाल परिसराची स्वच्छता

Add caption


सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली चांदबिबी महाल परिसराची स्वच्छता

वेब टीम नगर,दि. ३ - प्रत्येक शहराची ओळख त्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे होत असते. जशी आग्र्याची ओळख 'ताजमहाल' मुळे तशी नगरची ओळख 'चांदबीबी महल'मुळे. ही ओळख जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धन होणे गरजेचे असते. भावी पिढ्यांना या ऐतिहासिक वारस्याची महती पटली तरच ते हा वारसा जपतील किमान आपल्या हातून त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. याहेतूने पेमराज सारडा महाविद्यालयाने विद्यार्थ्यासाठी  'हेरिटेज वॉक' या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांदबीबी महाल, फराहबक्ष महाल, हस्तबेहस्त महाल, भुईकोट किल्ला, रणगाडा संग्रहालय या एतेहासिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांचा इतिहास समजून घेतला. या वास्तूंचे महत्व पटल्यानेच विद्यार्थ्यांनी चांदबीबी महाल परिसराची स्वच्छता केली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, पत्रावळ्या, कागद, बाटल्या आदि गोळा करून सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावली. तसेच शहराच्या या ऐतिहासिक वारशाचे जतन करू अशी शपथ घतली. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गांगुर्डे, प्रा. डॉ कृष्णा पाटील, प्रा. नवनाथ भोंदे, प्रा. प्रमोद तांबे यांनी केले. 
सदर उपक्रमास हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, अध्यक्ष शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, महाविद्यालयाचे अध्यक्ष  अनंत फडणीस, माजी सचिव सुनील रामदासी, प्राचार्य डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले.

Post a Comment

0 Comments