मातोश्री वृद्धाश्रमात सपाटीकरनाणे केला रस्ता तयार

मातोश्री वृद्धाश्रमात सपाटीकरणाने   केला रस्ता  तयार

‘अग्रनारी’ प्रांतीय महिला असोसिएशनचा उपक्रम

वेब टीम नगर,दि. ३ – विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमा मधील वृद्ध नागरिकांना ये – जा करण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या नगर शाखेच्या वतीने वृद्धाश्रमातील जागा सपाटीकरण करून फरशा लावून रस्ता तयार करून देण्यात आला. अग्रनारी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा किट्टू गोयल यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबण्यात आला. जेष्ठ शिक्षणतज्ञ किरण कालरा व सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत माकर यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे लोकार्पण झाले. यावेळी श्रीमती नरेश बंसल, कृष्णा अग्रवाल, सरस्वती अग्रवाल, कविता अग्रवाल, योगिता गुप्ता, प्रमिला अग्रवाल, पंकज गोयल, सुरज अग्रवाल, सागर गोयल, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक महावीर चोरडिया आदि उपस्थित होते.
 
   
 यावेळी बोलतांना किरण कालरा म्हणाल्या, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतोच या उत्तरदायीत्वाच्या भावनेने प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. मातोश्री वृद्धाश्रमामधील जेष्ठ नागरिकांसाठी अग्रनारीच्या महिलांनी सोई सुविधा उपलब्ध करून फार चांगले कार्य केले आहे. या सुविधांमुळे आज सर्व ज्ये ष्ठ नागरिकंच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. महिलांचे हे संघटन नावाप्रमाणेच सामाजिक कार्यात अग्रभागी आहे, याबद्दल अग्रनारीच्या सर्व महिला अभिनंदनास पात्र आहे.
          किट्टू गोयल म्हणाल्या, मातोश्री वृद्धाश्रम डोंगरावर असल्याने आतील परिसर टेकड्यांमुळे खडबडीत आहे.  आपल्या आई वडिलांसमान  असलेले ज्येष्ठ नागरिकांना  ये जा करण्यास फार त्रास होत होता. हे समजल्यावर लगेच निर्णय घेत वृद्धाश्रमातील जागा सपाटीकरण करून फरशा लावून देण्यात आल्या. यापुढील काळातही कायम याठिकाणी संपर्कात राहून विविध सुविधा देण्यास सहकार्य करू. येथील निसर्गरम्य वातावरणात सर्व ज्येष्ठ नागरिकांची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
यावेळी वृद्धाश्रमातील नागरिकांचे आपल्या भावना व्यक्त करतांना डोळे पाणावले. वृद्धाश्रमाच्या वतीने अग्रनारीच्या सदस्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments