सातारा येथे होणार्या ‘महाराष्ट्र श्री’ शरीर सौष्ठव
स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहिर
वेब टीम नगर,दि. ३ - महाराष्ट्र बॉडी बिंल्डीग असोसिएशन मुंबई व इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन संलग्न स्पोर्टस् अॅण्ड युथ मिनिस्ट्री ऑफ इंडिया ( भारत सरकार) यांच्या मान्यतने दि. ६ व ७ मार्च रोजी सातारा येथे भव्य महाराष्ट्र श्री २०२० स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेकडून जिल्हा संघ जाहिर करण्यात आला. स्पर्धा एकूण १० वजनी गटात होणार असून प्रत्येक गटात ६ बक्षिसे देण्यात येणार आहे. प्रथम- १२ हजार रुपये रोख, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, द्वितीय - १० हजार रुपये, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, तृतिय- ८ हजार रुपये, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, चतुर्थ - ६ हजार रुपये, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, पाचवा - ५ हजार रुपये, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, सहावा - ३ हजार रुपये, सन्मान पत्र, मेडल, सन्मान चिन्ह, किताब विजेता - १ लाख ५० हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, उपविजेता - ५० हजार रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, बेस्ट पोझर - १० हजार राखे, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रगतीकारक शरीर सौष्ठव पटू - १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, असे बक्षिसे देण्यात येणार आहे.अहमदनगर जिल्हा संघ पुढील प्रमाणे - निलेश वाडेकर, संतोष कोटामे, नवनाथ कुर्हे, सुधीर धुमाळ, जाकीर कुरेशी, रवि सुर्यवंशी, श्रीकांत जाधव, मनोज शिंदे, दिगंबर जोशी, मंगेश जठार, अल्सम सय्यद, सुदर्शन कर्डिले, अनुज रोहकले, विनोद सुरेकर व संघ व्यवस्थापकपदी मयुर दरंदले आणि संघ प्रशिक्षकपदी डेव्हिड मकासरे यांची निवड करण्यात आली आहे,अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भिंगारदिवे व सचिव मनोज गायकवाड यांनी दिली आहे.
पुढील वाटचालीस अहमदनगर जिल्हा बॉडी बिंल्डीग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मधुकर गायकवाड, कैलास रणसिंग, सतिष रासकर, शब्बीर अन्सार सय्यद, हनीफ शेख, अजित गायकवाड, सुरेंद्र बोराडे, प्रतिक पाटील, धनंजय पाटील, अनिल जाधव, तुषार पारधे, राहुल कुलकर्णी, कन्हैय्या गिलशेर, महेश भुजबळ, रविंद्र सांगळे, तुषार काळे, ओंकार कुंभकर्ण आणि संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी संघास शुभेच्छा दिल्या.
0 Comments