शाळा,महाविद्यालयांनाही पाच दिवसांचाआठवडा करा - शिक्षक नेते सुनिल गाडगे
वेब टीम नगर,दि. २ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचारी यांच्यासाठी एक मोठी भेट देत सरकारी व निमशासकीय कार्यालयाना आता आठवड्यातून ५ दिवस काम करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. आता सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवार अशी सुट्टी मिळणार आहे.त्याच धर्तीवर शाळा व महाविद्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची समक्ष भेट घेवुन मागणी केली आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा राज्यसचिव सुनिल गाडगे यांनी दिली.शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन राईट टू एज्युकेशनच्या अनुसार १ ली ते ५ वी च्या मुलांसाठी वर्षभरात २०० दिवस तथा८०० तास काम असावे, तसेच ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी २२० दिवस तथा १००० तास कामाचे मान्य केले आहे. आता सध्या शाळा व महाविद्यालय आठवड्यातून ६ दिवस चालतात. मानसशास्त्रांच्या दृष्टीने विचार केला तर मुलांना व शिक्षकांनाही ५ दिवसांचा आठवडा करुन आठवड्यातून दोन दिवस शनिवार व रविवार अशी सुट्टी देण्यात यावी. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देणे योग्य आहे, असे आमदार कपिल पाटील यांनी चर्चेत सांगितले.
राज्यातील कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा २९29 फेब्रुवारी पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे महिन्यातुन चार अतिरिक्त सुट्ट्या कर्मचार्यांना मिळणार आहे. मात्र या निर्णयातुन शिक्षकांना वगळण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून शिक्षकांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा. अशी मागणी अहमदनगर जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगताप, प्राथमिकचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्षा मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रोहिदास चव्हाण, किसन सोनवणे, इकबाल सय्यद, राजेंद्र जाधव, संजय पवार, प्रमोद दिवेकर, सुदर्शन ढगे, गंगाराम साबळे, संभाजी पवार, संतोष मगर, अनिल लोहकरे, रामनाथ थोरात, बाळासाहेब थोरात, संतोष देखमुख, योगेश हराळे, गोरे , लहामटे , काशिनाथ मते आदींनी केली आहे
0 Comments