शहरात अवकाळी पाऊस .......


 शहरात अवकाळी पाऊस 
वेब टीम नगर दि.1 - मुंबईत काहिली ,कोकणात उष्मा , आणि विदर्भात पाऊस आणि त्या पाठोपाठ उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वेध शाळेने व्यक्त केल्या नंतर अवघ्या दोनच दिवसात नगर शहर आणि उपनगरात पावसानं हजेरी लावली .
शहरात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते त्यात सूर्यदर्शन अधून मधून होताना दिसले . दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान शहरात पावसाची जोरदार सर बरसली अवघ्या १० मानतात शहरातील सखल भागातील रस्ते वाहते झाले. शहरा अगोदर तासभर एम.आय. डी. सी परिसरात पाऊस धारा बरसल्या त्याच बरोबर गारांचाही वर्षाव झाला त्या पावसाने शेतातील उभ्या पिकाला धोका होण्याची शक्यता असून रोगराई पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments