अहमदनगर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ उत्साहात

मिळालेल्या ज्ञानाचा देशाच्या उन्नतीसाठी

फायदा होईल याचा विचार करावा 

डॉ.अरसूड -  अहमदनगर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ उत्साहात
 वेब टीम नगर,दि. ८ -  प्रत्येकांच्या जीवनात शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण असे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडचणी येतात. त्या पार करीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातो आणि पदवी प्राप्त करतो. त्यामुळे त्याचे मूल्य पदविप्राप्त विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या शिक्षकांनीही जाणले पाहिजे.  तसेच  मिळालेल्या ज्ञानाचा समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी कसा फायदा होईल याचा प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करावा, असे प्रतिपादन स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉ. संजीवन अरसूड  केले.
     अहमदनगर महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीग्रहण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.संजीवन अरसूड  हे बोलत होते.  याप्रसंगी पदवीप्राप्त विद्यार्थी, प्रमुख पाहुणे, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य,महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक कार्यक्रमस्थळी आल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
     पुढे बोलताना डॉ.अरसूड म्हणाले, पदवी मिळावीने म्हणजे शिक्षण नसून खर्या जीवन शिक्षणाची सुरुवात पदवी प्राप्त केल्यानंतरच होते. शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांचे भान ठेऊन वैयक्तिक स्तरावर केलेल्या कामातूनच देशसेवा घडून येते असे त्यांनी सांगितले.
     यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संचालक डॉ. एन.आर. सोमवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. नागवडे, डॉ. बी. एम. गायकर, डॉ. सय्यद रज्जाक, परीक्षा समिती अध्यक्ष प्रा. अशोक लगड, रजिस्ट्रार श्री. ए. वाय.बळीद, परीक्षा अधिकारी डॉ. माधव शिंदे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.प्रशांत कटके यांनी केले.




Post a Comment

0 Comments