सडकसख्याहरीला नगरकरांचा चोप

वेब टीम नगर,दि. १० - मुलीची छेड काढणाऱ्याला सडकसख्याहरीची नगरकरांनी रस्त्यावरच धुलाई केली आहे. अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिला.

 शहरात एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना हा तरुण नेहमी तिची छेड काढायचा. आजही हा  तरुण छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा.

पाठलाग करण्यासारखेही प्रकार होत होते. आजही हा रोमिओ मुलीचा पाठलाग करत होता. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यावेळेस तिच्या मदतीला आजुबाजूचे नागरिक धावून आले आणि रोमिओला चांगलाच चोप दिला. स्थानिक नागरिकांनी या सडकसख्याहरीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या रोमिओला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेला रोमिओ हा नशेत असल्याचे पुढे येत आहे. राज्यात मुलींच्या आणि महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

0 Comments