गणित-विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड

भाग्योदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची
गणित-विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड 

  वेब टीम  नगर दि.८  -मातोश्री शैक्षणिक संकुल, कर्जुले हर्या, ता.पारनेर येथे जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेहोते. १४ तालुक्यातून जवळपास २२५ उपकरणांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.गणित विभागातून भाग्योदय विद्यालयाचा विद्यार्थी अजय हजारे या विद्यार्थ्यांस प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या या उपकरणाची राज्यस्तरीवरील गणित-विज्ञानप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. अहमदनगर शहरातून सहभागी झालेली ३ उपकरणे राज्यस्तरावर निवड झाली आहे.
     या अभुतपूर्व यशाबद्दल भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी रघुनाथ लोंढे,प्राचार्य ज्ञानदेव बेरड, विज्ञान विभागप्रमुख संजय गोसावी, ज्येष्ठ शिक्षकपोपटराव येवले, बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, धनंजयबारगळ, रुपाली शिंदे, ज्युनिअर विभाग प्रमुख गोविंद कदम, एकनाथ होले,बबन कांडेकर, दत्तात्रय पांडूळे अच्युतराव सुतार, हजारे आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments