वैदुवाडी येथील गटारीचे काम 'जैसे थे च'


 वैदुवाडी येथील गटारीचे काम 'जैसे थे च' 

वेब टीम नगर ,दि.८ - प्रभाग क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी, वैदुवाडी येथील गटारीचे काम होवून १५ दिवस उलटले तरी अद्याप गटार बुजविण्याच्या कामाकडे प्रभागातील नगरसेवक व महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे आहे. अशी टीका वैभव कॉलनी व वैदुवाडी येथील नागरिकांनी केली.
वैभव कॉलनी येथील प्रवेशद्वाराजवळच हे गटारीचे खोदकाम केले असल्यामुळे वैभव कॉलनीतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर हे खोल खड्डे केल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात त्या जागी पुरेशी लाईट नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
गटारीचे पाणी एका जागेवर साचून राहत आहे. यामुळे  परिसरात दुर्गंधी पसरली आहे व डासांचे प्रमाणही वाढले आहे.  मोठ-मोठे सिमेंटचे पाईप रस्त्यावरच टाकून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक व महानगरपालिकेला या गोष्टीचे काही सोयरे सुतक नाही

Post a Comment

0 Comments