ना.थोरात यांच्या रुपाने जिल्ह्याला राज्याच्या नेतृत्वाची संधी मिळाली- बाळासाहेब भुजबळ



ना.थोरात यांच्या रुपाने जिल्ह्याला राज्याच्या 

 नेतृत्वाची संधी मिळाली- बाळासाहेब भुजबळ

 वेब टीम नगर,दि. ८ -  जिल्ह्याचे सुपूत्र ना.बाळासाहेब थोरात यांना राज्याचे नेतृत्वकरण्याची संधी पुन्हा राज्याच्या सरकारमध्ये मिळाली. त्यांच्या कार्याचा ठसाजसा मागील कार्यकाळात उमटला तसा भविष्यात सुद्धा मंत्रीपदाच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर वरिष्ठ पातळीवर एकदिशा देण्याचे काम त्यांच्या हातून व्हावे आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना-गती मिळेल, अशी  अपेक्षा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केली.
     राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरातयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळीवाडा येथील महात्मा वसतीगृहातील मुलांना मिष्ठान्न अपोहार देण्यात आले. यावेळी भुजबळ बोलत होते.अध्यक्षस्थानी पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप सकट होते.
     प्रारंभी वसतीगृहातील मुलांनी प्रार्थना करुन ना.थोरातंना शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलतांना भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले म्हणाले,ना.बाळासाहेब थोरात हे पक्षाचे नेते म्हणून राज्यात कार्यरत आहेत, त्यांनीमंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करतांना नगर आणि भिंगारकडेलक्ष द्यावे. पक्षाचे सर्व ना.थोरातांचे कार्यकर्ते आहे आणि हा ऋणानुबंध आम्हीजपणार आहोत.
     महिला प्रदेश सदस्य शिल्पा दुसुंगे, मार्गारेट जाधव, सुनंदा थोरात,अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज शफी खान, प्रदेश सदस्यश्यामराव वाघस्कर, भिंगार काँग्रेस प्रवक्ता रिजवान शेख,  युवा नेते अजहरशेख, निजाम पठाण, संतोष धीवर, संजय झोडगे, विजय आहेर, अॅड.नरेंद्रभिंगारदिवे, रमेश कदम, गणेश कोरडे, सुवर्णा बोरुडे, सुमन काळापहाड, शामलकोरडे, आर.आर.पाटील आदि यावेळी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. शेवटीअरुण धामणे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments