भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती

भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती

आगामी निवडणुकात भाजपाची  डोकेदुखी वाढणार 
वेब टीम मुंबई ,दि.७ -भारतीय जनता पक्षाला तळागाळातून उखडून टाकण्यासाठी महाविकास आघाडीचा शहर ते शिवार अशी राज्यव्यापी  रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीचा पहिला टप्पा मनपा निवडणुकात ,म्हणजेच   नवी मुंबई औरंगाबाद येथे होणाऱ्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढून भारतीय जनता  पक्षाला नेस्तनाबूत करण्याच्या दृस्तीने योजना आखण्यात आली आहे .नजीकच्या काळात औरंगाबाद आणि नवी मुंबई येथे होऊ घातलेताब्यातल्या महानगरपालिका निवडणुकात महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून त्यामुळे नवी मुंबईत गणेश नाईक यांच्यापुढे कडवे आव्हान उभे राहिले असून औरंगाबाद मध्ये ही शिवसेनेचे पारडे जड राहणार आहे.  त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे .
महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी काळातही अन्य महापालिका निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचे आव्हान पेलणे भाजपला अवघड जाणार आहे. महानगरपालिकांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे.  भारतीय जनता पक्ष १४ महानगरपालिका. काँग्रेस पक्ष ४ महानगरपालिका शिवसेना चार नगरपालिका आणि इतर पक्षांच्या दोन महानगरपालिका असे चित्र आहे.  मात्र, नजिकच्या काळात होणाऱ्या निवडणुका नंतर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .तर जिल्हा परिषदेतही ३४जिल्हा परिषदांपैकी २३ महाविकास आघाडी ९भाजपा ,१ वंचित बहुजन आणि १ काँग्रेस आणि भाजप आघाडीच्या ताब्यात  असून शिवसेनेशी युती तुटल्याने सहा जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद भाजपला गमवावे लागले .मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर मोठय़ा प्रमाणावर मतभेद असल्याने भारतीय जनता  पक्षावर कोणताही परिणाम होणार ना असे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाचे म्हणणे आहे . 

Post a Comment

0 Comments