मनपा रक्तपेढीच्या दुरावस्थेस जवाबदार असलेल्यांचे निलंबन करणार

रक्तपेढीच्या दुरावस्थेस जवाबदार असलेल्यांचे  निलंबन करणार 

 उपमहापौर मालन ढोणे याचा इशारा
वेब टीम नगर,दि.७  -  सर्वसामान्य रुग्णांसाठी मनपाची रक्तपेढी महत्वाची आहे. रक्तपेढीची झालेली दुरावस्था खेदजनक आहे. या रक्तपेढीत पुन्हा सर्व सुविधा उपलब्ध करून कर्मचारींची नियुक्ती करून कार्यान्वित करण्यासाठी मनापा प्रशासनाची बैठक बोलून तातडीने निर्णय घेणार आहे. झालेल्या दुरावस्थेची सविस्तर चौकशी व्हावी व जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमहापौर मालन ढोणे यांनी दिला.
          दोन दिवसापूर्वी वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्ठमंडळाने मनपाच्या रक्तपेढीत जाऊन झालेल्या दुरावास्थेचा निषेध केला होता. उपमहापौर मालन ढोणे यांनीही आज भाजपच्या शिष्ठमंडळासह पुन्हा रक्तपेढीस भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील डॉक्टर व कर्मचार्याकडे  चौकशी केली. यावेळी जेष्ठ नेते वसंत लोढा, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अनिल गट्टाणी, वैभव जोशी, महेश नामदे, महावीर कांकरिया, साहेबराव विधाते, शरद मुर्तडक, निलेश साठे आदि उपस्थित होते.
          वसंत लोढा म्हणाले, दोन दिवसापूर्वी भाजपच्या शिष्ठमंडळाने या रक्तपेढीची झाडा – झडती  केली होती. रक्तपेढीची झालेल्या  दुरवस्थेला आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगेच जवाबदार आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरात या रक्तपेढीच्या माध्यमातून केवळ ४०० रक्ताच्या पिशव्यांचे संकलन झाले आहे. मात्र या साठी मनपाने येथील कार्माचारींना लाखो रुपये पगाराच्या रूपाने दिले आहेत. एकेकाळी १५०० ते २००० पिशव्याचे संकलन या रक्तपेढीत होत होते. मात्र आता झालेल्या दुरावस्थेमुळे ही रक्तपेढी तोट्यात आली आहे. तरीही मनपा कार्माचाऱ्याचे पगार करत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत ही रक्तपेढी पुन्हा कार्यान्वित करावी.
          महेंद्र गंधे म्हणाले, शहरातील सर्वात जुनी ही रक्तपेढी आहे. खाजगी रक्तपेढींपेक्षा चांगले काम येथून होत होते. मात्र झालेली दुरवस्था पाहून  दु:ख होत आहे. या रक्तपेढीची जवबदारी असलेले डॉ.बोरगे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई मनपा प्रशासनाने करावी.
          यावेळी उपस्थित असलेले रक्तसंकलन अधिकारी डॉ. शंकर शेडाळे यांनी उपमहापौर व भाजपाच्या पदाधिकाऱ्याना सध्याच्या परिस्थीतीची सविस्तर माहिती देत सांगितले, मनपा प्रशासन व आरोग्याधिकारी यांच्या कडे रक्तपेढीच्या सुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार व स्वतः भेटून मागणी केली आहे. मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये. किती दिवस अशा परीस्थितीत काम करायचे, त्यामुळे मीही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे.
 

Post a Comment

0 Comments