मीनानाथ खराटे यांना कलार्जून ,अनुराधा ठाकुर 

यांना कलाद्त्ता पुरस्कार 

रचना कला महाविद्यालयाचा २१ वा वर्धापन दिन  - दि.९ रोजी पुरस्कार वितरण सोहळा 
वेब टीम नगर,दि.७ -दिवंगत चित्रकार व कला अध्यापक अर्जुनराव शेकटकर व दत्तात्रय कांबळे यांच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत चिरंतन जागवल्या जागा या हेतूने या दोन दिग्गज कलावंत व शिक्षकांच्या नावे स्मृती पुरस्कार मागील चार वर्षांपासून दिले जातात .या वर्षीचा अर्जुनराव शेकटकर यांच्या स्मृती वृत्त देण्यात येणारा कलार्जुन पुरस्कार मॉडर्न स्कूल अकोले येथील कलाध्यापक मीनानाथ खराडे यांना तर .तर कै दत्तात्रय कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कलादत्ता पुरस्कार चित्रकार अनुराधा ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रचना कला महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर प्राचार्य सुभाष भोर आणि स्पर्धा संयोजक वर्षा शेकटकर यांनी दिली .हे पुरस्कार येत्या नऊ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येतील .
रचना कला  महाविद्यालयाच्या  एकवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन २ फेब्रुवारी रोजी दादा चौधरी विद्यालय येथे विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरीक यांच्या चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .  तसेच पाचव्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन रविवारी दि.  ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले असून नगर शहर व उपनगरांमध्ये सकाळी सात ते  एक यावेळेत आयोजित करण्यात आल्या आहे .या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ११,१११,द्वितीय पारितोषिक रुपये ७,७७७  आणि तृतीय पारितोषिक ५,५५५ रुपये तर उत्तेजनार्थ ३,३३३  रुपये अशी प्रत्येकी तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत .ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी व कला रसिकांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीचा स्पर्धकांनी सहभागी वाहण्याचे आवाहन प्रसिद्ध शिल्प व चित्रकार प्रमोद कांबळे यांनी केले आहे .
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. ९ रोजी कमलाबाई नवले स्मारक गुलमोर रोड नवलेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे या समारंभासाठी उदघाटक म्हणून आ.  संग्राम भैय्या जगताप  कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मुंबईचे कला निरीक्षक भास्करराव तिखे      शिल्पकार प्रमोद कांबळे,नगरसेवक गणेश भोसले, प्रसाद डोळस, मुरलीधर बारावे ,रामराव नवले ,चित्रकार प्रकाश बोरुडे ,डॉ.  पारस कोठारी ,सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धकांनी कला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रचना कला महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर प्राचार्य सुभाष भोर स्पर्धा संयोजिका वर्षा  शेकटकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments