८ व ९ फेब्रुवारी रोजी संस्कार भारतीतर्फे रांगोळी प्रशिक्षण वर्ग

८ व ९ फेब्रुवारी रोजी संस्कार भारतीतर्फे  रांगोळी प्रशिक्षण वर्ग        

वेब टीम नगर,दि.७ -संस्कार भारती ही गेल्या ३८ वर्षापासून विविध कलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनार्थ कार्यरत आहे.विविध ललित कला प्रकारांबरोबरच संस्कार भारतीने आपल्या विशेष शैलीतील रांगोळीचे वैशिष्ट्य जपले आहे.सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेत नंदीध्वज मिरवणूकीच्या मार्गावर ३-४ किलोमीटर लांबचलांब भव्य पायघड्या रांगोळी काढण्याची परंपरा संस्कार भारतीने गेल्या २२ वर्षापासून जपली आहे.वैशिष्टय़पूर्ण डिझाईन आणि विशिष्ठ शैलीमुळे संस्कार भारतीची रांगोळी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. 
संस्कार भारती अहमदनगर समितीच्या भू-अलंकरण (रांगोळी) विधेच्या पुढाकाराने खास नगरकरांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग तोफखाना येथील सिताराम सारडा विद्यालयात शनिवार दिनांक ८ व रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील.या वर्गात संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या भू-अलंकरण विधा प्रमुख संगीता भांबुरे, सोलापूर ह्या मार्गदर्शन करणार आहेत.तसेच त्यांच्या समवेत सोलापूर भू-अलंकरण शहर प्रमुख ममता अवस्थी, रंगावली कलाकार अनंत देशपांडे,विनायक बोड्डु आणि आनंद कोकुल हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. नगरकरांसाठी ही एक उत्तम संधी आहे, असे अध्यक्ष अँड दीपक शर्मा यांनी सांगितले.
या वर्गासाठी रांगोळी आणि आवश्यक इतर सर्व साहित्य संस्कार भारती पुरवणार आहे.जागा मर्यादीत असल्याने आपला सहभाग तत्परतेने नोंदवावा.नावनोंदणी साठी भू-अलंकरण विधा प्रमुख जयश्री पटवर्धन (मोबाईल क्रमांक - 9422726136) आणि विधा समन्वयक  गितांजली कुरापाटी (मोबाईल क्रमांक - 9271378485) यांचेशी संपर्क साधावा , असे आवाहन सचिव  विलास बडवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments