अहमदनगर कॉलेजमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय

अहमदनगर कॉलेजमुळे विद्यार्थ्यांच्या  शिक्षणाची मोठी सोय 

राईट बिशप थॉमस डाबरे- स्नेहसंमेलन प्रसंगी प्रतिपादन
   वेब टीम  नगर,दि. ६- अहमदनगर महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी.हिवाळे यांनी हे महाविद्यालय सुरु करुन नगर जिल्ह्यात एक नवी क्रांती घडविली. हे कॉलेज सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते. परंतु अहमदनगर महाविद्यालय सुरु झाल्याने येथील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची मोठी शिक्षणाची सोय झाली.   डॉ.बी. पी.हिवाळे यांची प्रेरणा घेऊन समाजासाठी हितकारक गोष्टी कराव्यात, असे प्रतिपादन राईट बिशप थॉमस डाबरे यांनी केले.
     अहमदनगर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बिशप डाबरे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, मुख्य संपादिका डॉ.अशिता बंडेलू उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे नियतकालिक प्रतिबिंब २०१९ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या मुखपृष्ठावर महाविद्यालयाच्या इतिहासात महत्वपूर्ण कामगिरी बजावणार्या  तीन महिलांना स्थान देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
     याप्रसंगी डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांना संस्कारक्षम व आधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर सामाजिक नितीमुल्ये जपून, देश कार्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. अनेक विद्यार्थीही देश व राज्य पातळीवर चमकत आहेत, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments