समाजाचे आरोग्य सांभाळण्याचा उपक्रम दिशादर्शक

समाजाचे आरोग्य सांभाळण्याचा उपक्रम दिशादर्शक

अॅड.नवले - श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबीर
वेब टीम नगर ,दि. ६ - आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजकार्यात आपण योगदान दिले पाहिजे. लाड सुवर्णकार समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन जे उत्सव व कार्यक्रम सादर करतात आहेत, त्यामुळे समाजात एकोप्याचे वातावरणा निर्माण होत आहे. त्यामुळे समाजोन्नत्तीचे सुरु असलेले काम कौतुकास्पद आहे. आपल्या संतांनी सांगितलेल्या विचारांचे अनुकरण करुन त्यावर मार्गक्रमण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातून मनुष्य व समाज सुखी होतो. पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या नेत्रशिबीरामुळे समाजाचे आरोग्य सांभाळण्याचा उपक्रम दिशा दर्शक असाच आहे, असे प्रतिपादन माजी पोलिस विधीप्रवक्ते  अॅीड.बाळासाहेब नवले यांनी केले.
     लाड सुवर्णकार समाजाच्यावतीने श्री संत नरहरी महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन माजी पोलिस विधीप्रवक्ते  अॅयड.बाळासाहेब नवले यांच्या हस्ते  दिपप्रज्वलने झाले. याप्रसंगी फिनिक्स फौंडेशनचे जालिंदर बोरुडे, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर, प्रकाश देवळालीकर, मुकुंदराव निफाडकर, किशोर शहरकर, डॉ.मीरा पटारे, डॉ.संजय शिंदे आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी फिनिक्सचे जालिंदर बोरुडे म्हणाले, आज लहानांपासून थोरांपर्यंत डोळ्यांच्या समस्यांचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे. विशेष ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य सेवा महाग होत असल्याने अनेका खर्च परवडत नाही, अशा परिस्थितीत मोफत शिबीराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा घडत आहे. फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नेहमीच अशा कार्यात सहकार्य करुन मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
     प्रास्तविकात प्रकाश देवळालीकर म्हणाले,  धार्मिक कार्याबरोबर सामाजिक बांधलकी ठेवून या वर्षी प्रथमच समाजाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे. समाजाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येत असते. त्यातून समाजा उन्नत्तीचे काम होत आहे. यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करत आहेत. श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहा कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
     या शिबीरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी करुन २३ जणांवर पुणे येथील के.के.आय. बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय देवळालीकर, दिनेश देवळालीकर, वंदना,  वनिता शहरकर, लिलाताई शहरकर, मोहन देवळालीकर, विणेकरी परमेश्वधर साबळे, रमेशराव सदाफुले, शामराव जगदाळे आदिंंनी परिश्रम घेतल सूत्रसंचालन संजय देवळालीकर यांनी केले तर आभार मुकुंद निफाडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments