क्रेऑन्स प्ले व नर्सरी स्कुल चे स्नेहसंमेलन उत्साहात
वेब टीम नगर ,दि. ६-क्रेऑन्स प्ले व नर्सरी स्कुल चे स्नेह संमेलन नुकतेच माउली सभागृहात उत्साहात पार पडले . या स्नेह संमेलनाचा शुभारंभ श्रीमती श्रीकुवरबाई बोरा यांच्या हस्ते दीप प्रजवलनाने करण्यात आला प्रथितयश उद्योजक मोहन मानधना ,प्रमोद नेवासकर ,अजित कर्नावट ,मर्चन्टस बँकेचे संचालक संजय बोरा , कल्याणी गौरव फिरोदिया , सुजाता लोढा , कल्पना बोरा ,स्कुलच्या संचालिका समता बोरा ,.आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ..या स्नेहसंमेलनात वयोगट एक ते पाच च्या विद्यार्थी विद्यार्थीनींचे विविध गुणदर्शना बरोबर,समूह नृत्य ,वैयक्तिक नृत्य ,गायन तसेच आई,वडिलांबरोबर पाल्यांनी देखील नृत्य केले.या नृत्य प्रकारास मदर टॉटलर असे म्हंटले जाते यामुळे मुलांच्या मध्ये आत्मविश्वासाची निर्मिती होते असे संचालिका समता बोरा यांनी सांगितले . यांचे अतिशय उत्तमरीतीने बालकांनी सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली . क्रेऑन्स प्ले व नर्सरी स्कुलमध्ये १०० मुले ,मुली शिक्षण घेत असून अतिशय आधुनिक शिक्षण पद्धतीने व शिस्तीचे धडे या स्कुल मध्ये बालकांना दिले जातात .सध्याच्या बदलत्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना प्रात्यक्षिकासह ज्ञान देणे अतिशय गरजेचे असून .यामुळे मुलांची आकलनशक्ती वाढीस लागते .कृतीशिलता वाढीस लागते. यामुळे आशा बारीक सारिख गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत असूनयातून या मुलांचा बौद्धिक विकास साधण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे याच बरोबर शासन मान्यताप्राप्त टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आमच्याकडे सुरु केलेली असून प्रि,प्रायमरी स्कुलचा बालकांना शास्त्रशुद्ध शिक्षण कसे धांवे यासाठी १२ वि पास झालेल्यांसाठी हा कोर्से असून यात १००टक्के प्लेसमेंट आहे तरी इच्छुकांनी क्रेऑन्स प्ले व नर्सरी स्कुल येथे संपर्क साधावा असे आवाहन केले .या स्नेहसंमेलनात टीचर्स व बालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरवातीला नुकत्याच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्वर्गीय वीणा दिवाणी याना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांची दीड वर्षाची कन्या या स्कुल मध्ये शिकत आहे . कार्यक्रमास मोठ्या संख्येने विध्यार्थी .व पालक उपस्थित होते.
0 Comments