भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार

भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार 

डॉ.उदय नाईक-डॉ.विखे अभियांत्रिकीच्या  इलेक्ट्रीक वाहनास देशात तिसरा क्रमांक
वेब टीम  नगर,दि . ६ - वाढती लोकसंख्या, वाढती वाहने याच्या तुलनेत पेट्रोल व डिझेलचे मर्यादित साठे शिल्लक राहत असून, वाढती गरज लक्षात घेता भारत सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.
     डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या ‘टीम मेक्ट्रा’ ने बनविलेल्या इलेक्ट्रीक वाहनास महाराष्ट्रात दुसरा तर भारतात तिसरा क्रमांकाचे मानकरी ठरल्याबद्दल विद्यार्थ्यांचा फौंडेशनच्यावतीने जाहीर सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ.नाईक बोलत होते. या सोहळ्यास विभागप्रमुख डॉ.किशोर काळे, इलेक्ट्रीकल विभागाचे प्रा.सतीश मरकड, प्रा.चंदना शाह, प्रा.प्रियंका राऊत, प्रा.ज्योती बोटकर आदि उपस्थित होते.
     डॉ.नाईक पुढे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे दुचाकी वाहनांची मागणी वाढत आहे. एका घरात चार व्यक्ती असल्या तरी त्यांच्याकडे चार वाहने आहेत.

Post a Comment

0 Comments