जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा घंटानाद आंदोलनाचा इशारा
जि. प. कर्मचारी युनियनचा  घंटानाद आंदोलनाचा इशारा 

वेब टीम नगर ,दि.४- जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महाराष्ट्र जिल्हा परिषद ही पंचायत समिती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण झाल्यापासून जिल्हा परिषदेत कार्यरत असून जवळपास सर्व केंद्राच्या मागण्यांविषयी मागण्यांविषयी शासन दरबारी त्या मान्य करून घेण्याचे काम 1964 सालापासून आजतागायत करत आहे

अंशदायी पेन्शन योजने अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10 टक्के अनुदान कपात केले आहे त्यानुसार शासन हिस्सा जमा होणार आहे परंतु बहुतांशी कर्मचार्‍यांच्या बाबतीत त्यांनी कपात केलेली दहा टक्के रक्कम आणि शासन हिस्सा यांचे परिपूर्ण कपाती सह  लेखे  न मिळाल्याने त्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व सर्व मित्र संघटना या मागील दहा वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत मात्र प्रशासन याबाबतीत चालढकल करीत असून ते आमच्या सर्व संघटनांच्या ध्यानात आले आहे.
 जिल्हापरिषद कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी  मुख्याधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखाली तीन जानेवारी रोजी सर्व संघटनांची बैठक झाली या बैठकीत देखील सर्व संघटनांनी अंशदायी पेन्शन योजने अंतर्गत कपात केलेल्या रक्कमेचा हिशोब तात्काळ मिळण्यासाठी विनंती केली त्या अनुषंगाने एक निश्चित कालावधी ठरवून एक ते दोन महिन्यात लेखे अद्ययावत केले जातील असे आश्‍वासन सर्व संघटनांना दिले आहे.
 त्या संदर्भातील आवश्यक ते आदेश येत्या दोन-तीन दिवसात पारित केले जातील असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी  सभाग्रहात दिले  होते परंतु तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटून गेला परंतु साधा आदेश देखील पारित झालेला नाही यावरून पुढील काम किती गतीने केले जाईल याबाबत आमच्या सर्व संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी साशंक आहेत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशाचा हिशोब मिळण्यासाठी दहा वर्ष संघर्ष करावा लागतो आणि तो करूनही आज अखेर काही एक फलित हाती न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात कमालीची नाराजी आहे ही नाराजी नजीकच्या काळात मोठ्या स्वरूपातील आंदोलनात बदलण्याची शक्यता आहे आम्ही सर्व जिल्हा परिषद कर्मचारी असून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची कर्मचाऱ्यांची इच्छा नसताना केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत या नोटीस द्वारे आम्ही लक्ष वेधू इच्छितो की अंशदायी पेन्शन योजने अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेले अंशदान व यांचा ताळमेळ घालत व त्यानुसार कर्मचाऱ्यांची डीसीपीएस कपाती नोंद अद्ययावत करून आज अखेरपर्यंत परिपूर्ण लेखे  कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणे यासाठी मुख्यालय व तालुकानिहाय टीम तयार करावी यामध्ये सहाय्यक लेखाधिकारी, आस्थापना लिपिक, कॅशियर, यांचा समावेश असावा व त्यांनी अहवाल उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी गटविकास अधिकारी यांना सादर करावा आणि या संपूर्ण कामकाजाचे नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी काम पाहावे अशा स्वरूपाचे आदेश येत्या सात दिवसात जिल्हा परिषद प्रशासनाने पारित केले पाहिजेत आणि संपूर्ण डीसीपीएस लेखे अद्ययावत करण्यासाठी गठीत केलेल्या टीमला कमाल तीन महिन्यांचा कालावधी देऊन प्रत्येक सोमवारी टीमने सादर केलेल्या कामकाजाचा अहवाल नियंत्रण अधिकारी यांना द्यावा आणि तीन महिन्याच्या मुदतीत संपूर्ण लेखे पूर्ण करावेत जिल्हा परिषद प्रशासन मार्फत वेळीच कारवाई न झाल्यास प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव गुरुवार  दि. 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद घंटानाद आंदोलन करणार आहेत

Post a Comment

0 Comments