शिवसेनेची भूमिका मी ठरवतो -उद्धव ठाकरे

शिवसेनेची भूमिका मी ठरवतो -उद्धव ठाकरे

वेब टीम सिंधुदुर्ग,दि. १८- नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच 'सामना'त अनेक प्रकारच्या जाहिराती येतात. म्हणून त्या शिवसेनेच्या भूमिका नसतात. 'सामना'त बद्धकोष्ठतेचीही जाहिरात येते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला. त्यामुळे नाणारबाबतच्या विषयावर पडदा पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून जाहिरात आली होती. पण शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो. ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार शिवसेनेचे धोरण ठरवत नाही. 'सामना'त बद्धकोष्ठतेचीही जाहिरात येते, असं सांगतानाच नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments