लक्ष्मी कथेत श्री लक्ष्मी नारायण विवाह उत्साहात
लक्ष्मीचे आगमन माता लक्ष्मी स्वरूपात होवो-वैष्णवाचार्य युगल शरणजी महाराज

लालटाकी रोड खाकीदास बाबा मठ येथे ''लक्ष्मी महात्म्य कथा'च्या दुसऱ्या दिवशी श्री लक्ष्मी नारायण विवाह थाटात मोठ्या उत्साहात झाला.भक्तिमय वातावरणात मधुर वाणीने वैष्णवाचार्य श्री युगल शरणजी महाराज यांनी लक्ष्मी महात्म्य कथेचे निरूपण केले.माता लक्ष्मी व श्री साक्षात विष्णू नारायणाचे मनमोहक व सुंदर असे रूप पाहून भाविकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी लक्ष्मी कथेत भाविक मन्त्र मुग्ध झाले.बँड पथक व संगीतमय सुंदर अश्या शंख ध्वनींच्या निनादात श्री लक्ष्मी नारायणाचे आगमन मंडपात झाले.याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.महिलांनी फुगडीचा फेर धरला. वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळातर्फे श्री वैष्णवाचार्य श्री युगल शरणजी महाराज यांच्या हस्ते श्री रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीच्या चेरमनपदी श्रीगोपाल धूत यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात श्री लक्ष्मी (सौ.योगिनी माहेश्वरी) तर विष्णू नारायण ( सौ.राधिका लढ्ढा)यांनी सुन्दर वेशभूषा केली होती.
0 Comments