मराठा सोयरीक ग्रुपचे औरंगाबाद ,संगमनेरमध्ये वधुवर मेळावे


मराठा सोयरीक ग्रुपचे औरंगाबाद ,संगमनेरमध्ये वधुवर मेळावे

वेब टीम नगर ,दि. १५- मराठा सोयरीक ग्रुप मार्फत मराठा वधु-वरांच्या भव्य अशा दोन  ४४ व ४५ व्या परिचय थेटभेट मेळाव्याचे आयोजन औरंगाबाद व संगमनेर येथे करण्यात आलेले आहे. ४४ वा मेळावा  शुक्रवार   दि. २१  रोजी  सकाळी ९ ते ३ या वेळेत औरंगाबाद शहरात, जिजाऊ मंदीर, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ होणार आहे. ४५ वा मेळावा संगमनेर शहरात सिद्धीविनायक लॉन्स, पंचायत समितीजवळ, नगर रोड येथे होणार आहे.
 मराठा समाजामध्ये स्थळे  बघताना सरकारी नोकरी, हुंडा, सौंदर्य, इतर मालमता अशा अनेक अपेक्षा वाढल्यामुळे वेळेअभावी लग्न जमवणे ही प्रक्रिया अवघड झाल्याने मेळाव्याची गरज आहे असे मराठा सोयरीक ग्रुपचे अध्यक्ष अशोक कुटे व अ.नगर  माध्यमीक शिक्षक बँकेचे  संचालक कैलास रहाणे  यांनी सांगितले. मेळाव्याबाबत सविस्तर माहिती देताना ग्रुपचे मार्गदर्शक व लेखक धनंजय पाटील  म्हणाले की, भावी आयुष्यातील जोडीदार सुयोग्य असला म्हणजे पुढील आयुष्य अधिक सुखमय होते. विवाह योग्य वधू-वरांना सुयोग्य व सहजपणे जोडीदार मिळावा या उदेशाने हा मेळावा ठेवला आहे.
या मेळाव्यासाठी वधूवरांनी स्वतः फोटो बायोडाटासह उपस्थित राहावे. येणार्‍या पालकांना मेळाव्याच्या ठिकाणी नांव नोंदणी करता येईल. आतापर्यंत मराठा सोयरीक ग्रुपचे राज्यातील विविध जिल्ह्यात ४३ यशस्वी वधु-वर मेळावे झाले आहेत. त्या मेळाव्यांच्या व ग्रुपच्या प्रामाणिक कार्यामुळे  तीन वर्षात ९०६ विवाह जमले आहेत.
       महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा ह्या सामाजिक ग्रुपचे अनेक अधिकारी , पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , महिला , पोलीस अधिकारी, शिक्षक, डॉक्टर , वकील, शेतकरी, सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरीक सदस्य आहेत.  मराठा सोयरीक ग्रुपची वेबसाईट , संपर्क कार्यालय नगरमध्ये ओम गार्डन येथे चालू आहे. त्याचा सर्वाना बराच फायदा झाला आहे. लग्नाबद्दल मार्गदर्शनासाठी ८८४७७२४६८०  या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.   या मेळाव्यात जालना, अहमदनगर, मुंबई, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, बीड अशा अनेक विविध शहरातील वधु-वर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये अनुरूप वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत. तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. या मेळाव्यामध्ये वधूवरांनी स्वतः २-२ फोटो बायोडाटासह हजर राहावे, असे आवाहन सोयरीक  ग्रुपचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, शिवप्रहारचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगळे, लेखक लक्ष्मीकांत कोलते, संकल्प इव्हेंटचे संचालक भागवत भोरे, भास्करराव कुटे , भागवत कर्पे, औरंगाबाद  जिजाऊ बिग्रेड जिल्हाध्यक्षा हेमा पाटील, जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. वैशाली कडू, अ. नगर जि. कार्याध्यक्षा वृषाली कडलग, जिल्हा उपाध्यक्षा श्रद्धा वाणी, तालुकाध्यक्षा दिपाली पानसरे, संचालिका जयश्री कुटे, संचालिका अंजली पठारे, संभाजी ब्रिगेडचे नेते सोमनाथ नवले, संगमनेर ता.अध्यक्ष मंजाबापू गुंजाळ,  ग्रुपचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व सदस्य यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments