प्रमोद चौधरी यांना डि.लिट्. पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन


प्रमोद चौधरी यांना डि.लिट्. पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन

     वेब टीम नगर,दि. १४ -  स्व.स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांचे नातू व पुणे येथील प्राज इंडस्ट्रिजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने मानाची डि.लिट्. (विद्यानिधी) पदवी देऊन गौरविले जाणार आहे. शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी हा पदवी प्रदान समारंभ पुणे येथे होणार आहे.
     स्व.स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी व हिंद सेवा मंडळाचे घनिष्ठ संबंध आहेत. प्रमोद चौधरी यांना मिळालेल्या डि.लिट पदवीबद्दल हिंद सेवा मंडळाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, सचिव संजय जोशी, माजी सचिव सुनिल रामदासी, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, दादा चौधरी मराठी शाळेचे अध्यक्ष  सुमतीलाल कोठारी, दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष  अ‍ॅड.सुधीर झरकर, मुख्याध्यापक संजय मुदगल, सुभाष येवले आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
     याबद्दल बोलतांना अजित बोरा म्हणाले, स्व. स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांच्या नावाने चालू असलेल्या शाळेत उत्कृष्ट ज्ञानदानाचे काम सर्वसामान्य विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांच्यानंतर त्यांचे नातू प्रमोद चौधरीही या कार्यात सक्रीय सहभाग देत आहेत. वेळोवेळी दादा चौधरी शाळेला मदतही करत आहेत. त्यांना मानाची डि.लिट् पदवी मिळाल्याचा अभिमान हिंद सेवा मंडळाला आहे.

Post a Comment

0 Comments